Shivendra Sinha Raje | आघाडी आता विसरा, आपण भाजपचे आहोत!" शिवेंद्रसिंहराजेंचा सातारा नगरसेवकांना कडक कानमंत्र
शिवेंद्रसिंहराजेंनी टोचले भाजप नगरसेवकांचे कान
सातारा : आपल्या प्रभागातले एखादे काम अडत असेल आणि चुकीचं होत असेल ते वारंवार सांगून प्रशासन ऐकत नसेल तर तुम्हाला सभागृहात बोलण्याचा अधिकार आहे. योग्य असेल ते बोलले पाहिजे परंतु कोणाची मने कलुषित होतील असे न बोलता एकमेकांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे, पूर्वी आघाड्या होत्या, आता भाजपमधून निवडून आलो आहोत, एकीने काम करा असा कानमंत्र मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवकाना पार्टी मीटिंगमध्ये दिला आहे. दरम्यान, त्यांनी कस्तुरबा रुग्णालयाच्या इमारतीबाबत स्पष्टीकरण दिले.
पालिका सर्वसाधारण सभा मंगळवारी होत असून त्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात पार्टी मीटिंग घेतली त्यांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या मीटिंगला नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, नगरपालिका मोठी कामे घ्यायची आहेत त्याबद्दल चर्चा करताना सीओ, अधिकारी, प्रशासन असलं पाहिजे. वारंवार सांगून प्रशासन ऐकत नसेल तर बोलण्याचा अधिकार सभागृहात आहे. जे योग्य असेल ते बोललं पाहिजे, कोणाची एकमेकांबद्दल मन कलुषित होतील असे न करता योग्य असेल ते सभागृहात म्हणणे मांडावे. इथे निवडून आपण भाजपम्हणून आलो आहोत आघाडी नाही. मी आणि उदयनराजे आम्ही भाजप म्हणून एकत्र काम करतोय तसेच नगरसेवकांनी त्याच पद्धतीने काम करावे. आघाडी वैगरे पूर्वी होते ते डोक्यातून काढून टाकावे. सगळ्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन प्रत्येकाची कामे कराबी, नवीन महिला नगरसेवक यांना ही स्थान द्यावे, असा कानमंत्र त्यांनी दिला.
पुढे ते म्हणाले, कस्तुरबा रुग्णालय बाबत माहिती घेतली आहे. जुनी इमारत होती तिथे चुकीचे प्रकार होत होते. जीर्ण इमारत इमारत उतरवून घेण्याचा आधीच ठराव झाला होता, असेही त्यांनी सांगितले.