अन्नसाखळीत दुप्पट होत आहेत फॉरएवर केमिकल
जगातील अन्नसाखळीत एक असा अदृश्य धोका वाढत आहे, जो अखेर माणसापर्यंत पोहोचत आहे. 119 जलीय आणि स्थलीय अन्नसाखळींच्या जागतिक अध्ययनातून फॉरएवर केमिकल म्हटले जाणारे पीएफएएस (पर-एंड पॉली-फ्लोरो अल्काइल सब्टेंसेस) प्रत्येक स्तरावर सरासरी दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे. याचा थेट अर्थ शीर्ष शिकारी जीवांसोबत माणूसह या विषारी रसायनांच्या धोकादायक स्तराच्या संपर्कात आहे असा होतो.
भोजन ठरला मुख्य मार्ग
अन्नसाखळीत शीर्षस्थानी असल्याने माणसांसाठी भोजन पीएफएएस शरीरात पोहोचण्याचा प्रमुख मार्ग ठरल्याचे अध्ययनातून कळते. यापूर्वीच्या अनेक अध्ययनांमध्ये या रसायनांना हार्मोनल गडबड, प्रतिरक्षा तंत्रावर प्रभाव आणि काही प्रकारच्या कॅन्सरच्या जोखिमीशी जोडले गेले आहे. शीर्ष शिकारी जीवांमध्ये पीएफएएस जलदपणे जमा होणे पर्यावरणीय जोखिमींच्या एका धोकादायक स्थितीकडे इशारा करत असल्याचे सांगण्यात आले.
या अध्ययनात 72 वेगवेगळ्या पीएफएएसचे विश्लेषण करण्यात आले. याच्या निष्कर्षांमधून काही अशी नवी रसायने, ज्याना पूर्वीच्या पीएफएएसच्या तुलनेतअधिक सुरक्षित सांगतबाजारात आणले गेले होते ते देखील अन्नसाखळीत तितक्याच वेगाने आणि काही प्रकरणांमध्ये त्याहून अधिक जमा होत असल्याचे कळले आहे. जर याच्या दीर्घकालीन आरोग्य प्रभावांना वेळी समजून न घेतल्यास ही मोठी समस्या ठरू शकते असे संशोधकांचे मानणे आहे.
धोरणांमध्ये बदलाची गरज
संशोधकांनी वर्तमान आंतरराष्ट्रीय धोरणांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. रसायनांच्या नियमनात अनेकदा त्यांच्या तात्कालिन विषारीपणालाच आधार केले जाते, तर हे अन्नसाखळीत किती वेगाने जमा होतात हे पाहिले जात नाही असे त्यांचे सांगणे आहे. अनेक स्तरांवर त्वरित धोरणात्मक कारवाई करण्याची संशोधकांनी केली आहे. केवळ विषारीपणा नव्हे तर अन्नसाखळीत वाढण्याच्या क्षमतेलाही नियमांचा आधार केले जावे असे त्यांनी सुचविले आहे.