For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kokan News: रत्नागिरीत 4 नर जातीचे वाघ, 6 ब्लॅक पँथर CCTV कॅमेऱ्यात कैद

03:12 PM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
kokan news  रत्नागिरीत 4 नर जातीचे वाघ  6 ब्लॅक पँथर cctv  कॅमेऱ्यात कैद
Advertisement

रोपे म्हणजे शेतकऱ्यांची भविष्यातील गुंतवणूक, वनाधिकारी गिरीजा देसाई

Advertisement

चिपळूण: जिल्ह्यातील जंगलात 4 नर जातीचे वाघ आहेत. त्यांचे अस्तित्व सीसीटिव्ही कॅमेऱ्यामधून दिसून आले आहे. तसेच 6 ब्लॅक पँथर, मोठ्या प्रमाणात वानर, माकड असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी दिली.

चिपळूण-रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरी आणि ग्लोबल चिपळूण टुरीझम यांच्या संयुक्त विद्यमाने, शनिवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात वनविभाग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप आणि वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. 

Advertisement

त्या पुढे म्हणाल्या की, एकूण वन क्षेत्रापैकी 99 टक्के क्षेत्र हे खासगी मालकीचे असून केवळ 1 टक्का वनक्षेत्र वनविभागाकडे आहे. मात्र असे असले तरी सर्वच वनक्षेत्रात विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे.खासगी क्षेत्रात वनविभागाला काहीही करता येत नसून करायचे झाल्यास अनेक अडचणी येतात.

जिल्ह्यातील वनक्षेत्रामध्ये लावण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये चार वाघांचे अस्तित्व दिसून आले आहे. ही बाब अतिशय महत्वाची आहे. याचबरोबर 6 ब्लॅक पँथर व मोठ्या प्रमाणात वानर, माकड दिसून येतात.

प्राण्यांमुळे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान होत असून त्याची भरपाई देण्याची कार्यवाही कार्यालय स्तरावरून तातडीने होते. गतवर्षी नुकसानीपोटी 75 लाख रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

खैर प्रजातीच्या आता लावली जाणारी रोपे म्हणजे शेतकऱ्यांची भविष्यातील गुंतवणूक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी अशी रोपे वाटली जातील त्यांनी ती लावावी व आपला आर्थिक फायदा करून घ्यावा, असे आवाहनही विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले.

Advertisement
Tags :

.