For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यावर तरंगणारे जंगल

07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाण्यावर तरंगणारे जंगल
Advertisement

जगातील सर्वात अनोखा नॅशनल पार्क

Advertisement

भारत स्वत:चे नैसर्गिक सौंदर्य आणि अनोख्या ठिकाणांसाठी पूर्ण जगात ओळखला जातो. काही ठिकाणी हिमाच्छादित पर्वत आहेत, तर काही ठिकाणी घनदाट जंगल अन् शांत सरोवरं आहेत. परंतु या सर्वांदरम्यान ईशान्य भारताच्या मणिपूरमध्ये एक असे ठिकाण आहे, ज्याला पाहून प्रथमदर्शनी डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. येथे जंगल जमिनीवर नाही तर पाण्यावर तरंगताना दिसून येते. याचमुळे केबुल लाम्जो नॅशनल पार्कला जगातील एकमात्र तरंगणारे नॅशनल पार्क म्हटले जाते. हे अनोखे नॅशनल पार्क इम्फाळपासून सुमारे 53 किलोमीटर अंतरावर आहे. हे जंगल प्रसिद्ध लोकटाक लेकच्या वर फैलावलेले असून सुमारे 40 चौरस किलोमीटर क्षेत्रात अस्तित्वात आहे. येथे पोहोचल्यावर निसर्गाने पाणी आणि जंगलाला एकत्र आणत जादुई जग निर्माण केल्याची अनुभूती होते. चहुबाजूला फैलावलेले शांत पाणी, हिरवाई आणि तरंगणारे छोटे छोटे भूभाग या ठिकाणाला अधिक खास स्वरुप देतात.

या पार्कचे सर्वात मोठे वैशिष्ट्या येथील फुमडी आहे. फुमडी प्रत्यक्षात माती, गवत, रोप आणि इतर जैविक पदार्थांनी मिळून निर्मित नैसर्गिक तरंगणारी बेटं असतात, हे हवामानानुसार स्वत:चे रुप बदलत राहतात. पावसावेळी सरोवराची पातळी वाढल्यावर हे पाण्यावर तरंगू लागतात, तर हिवाळ्यात खाली जात सरोवराच्या पृष्ठभागावरून पोषण मिळवितात. याचमुळे येथे जमीन स्वत:च पाण्यावर तरंगत असल्याचे वाटू लागते. हे पार्क याचबरोबर दुर्लभ संगाई हरणांसाठी प्रसिद्ध आहे. संगाईला मणिपूरचा राज्य पशू मानले जाते. जेव्हा हे हरिण फुमडीवर चालते, तेव्हा जणू नर्तक व्यासपीठावर सादरीकरण करत असल्याचा भास होतो. याचमुळे याला डान्सिंग डियर असेही म्हटले जाते. वन्यजीव प्रेमी आणि फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी हे ठिकाण जणू नंदनवनच आहे. येथे येणारे पर्यटक डोंगीच्या सवारीचा आनंद घेऊ शकतात. पाण्यादरम्यान तरंगणारी बेटं आणि गवताने वेढलेल्या रस्त्यांमधून जाणे एखाद्या फिल्मी दृश्यासारखा अनुभव देणारे आहे. खासकरून सकाळच्या वेळी येथील दृश्य अत्यंत शांत आणि मनमोहक दिसते.

Advertisement

Advertisement
Tags :

.