महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना मारहाण

06:01 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वसतिगृहात घडला प्रकार  

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात रविवारी रात्री उशिरा विदेशी विद्यार्थ्यांना काही युवकांनी मारहाण केली आहे. हे विदेशी विद्यार्थी आफ्रिका, अफगाणिस्तान आणि उझ्बेकिस्तान इत्यादी देशांचे नागरिक आहेत. युवकांच्या एकट गटाने सामूहिक प्रार्थना न करण्यासाठी दबाव आणला होता असा दावा जखमी विद्यार्थ्यांनी केला आहे. तर जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आणि निष्पक्ष चौकशी निश्चित करण्याचा निदेश गृहमंत्र्यांनी दिला आहे.

विद्यापीठ परिसरात कुठलीच मशीद नाही, यामुळे सामूहिक प्रार्थनेसाठी वसतिगृहात काही विद्यार्थी एकत्र आले होते. याचदरम्यान लाठ्या आणि चाकू हातात घेतलेल्या एका जमावाने हल्ला केला, यावेळी विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात आले आणि खोल्यांमध्ये तोडफोड करण्यात आली. वसतिगृहाच्या सुरक्षा रक्षकाने जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्याला यश आले नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

5 जखमी विद्यार्थ्यांमध्ये अफगाणिस्तान, श्रीलंका आणि तुर्कमेनिस्तानातील प्रत्येकी एक तर आफ्रिकन देशांमधील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जखमी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या देशांच्या दूतावासांना घडलेला प्रकार कळविला आहे.

ओवैसींकडून सरकार लक्ष्य

या घटनेप्रकरणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मुस्लीम जेव्हा शांततेत स्वत:च्या धर्माचे पालन करतात, तेव्हाच काही जणांकडून धार्मिक घोषणा दिल्या जातात. मुस्लिमांना पाहून काही जण विनाकारण संतप्त होतात, हा प्रकार सामूहिक कट्टरवाद नाही तर मग काय? या घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हस्तक्षेप करणार का असे प्रश्नार्थक विधान ओवैसी यांनी केले आहे.

20-25 जणांवर एफआयआर

गुजरात विद्यापीठात सुमारे 300 विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सुमारे 75 विदेशी विद्यार्थी ए ब्लॉकमध्ये (वसतिगृह) राहतात.  रविवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांचा एक समूह सामूहिक प्रार्थना करत असताना जवळपास 20-25 जणांचा समूह आला, त्याने या विद्यार्थ्यांना विरोध दर्शविला. यानंतर त्यांच्यात झटापट अन् दगडफेक झाली. बाहेरून आलेल्या लोकांनी वसतिगृहात तोडफोड केली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत 20-25 जणांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात असल्याचे अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article