For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीम इंडिया प्रशिक्षक रेसमधून विदेशी खेळाडू बाहेर

10:11 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीम इंडिया प्रशिक्षक रेसमधून विदेशी खेळाडू बाहेर
Advertisement

जस्टीन लँगर, रिकी पॉटिंग, कुमार संगकारा, स्टीफन फ्लेमिंग यांचा नकार : गौतम गंभीरचे नाव आघाडीवर

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता

भारतीय क्रिकेट संघ नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. रोज नवनवीन नावं समोर येत आहेत. रिकी पॉटिंग आणि जस्टिन लँगर यांची नावे भारतीय प्रशिक्षकासाठी चर्चेत होती, परंतु बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आम्ही कोणत्याही ऑस्ट्रेलियन खेळाडूला प्रशिक्षकासाठी संवाद साधला नसल्याचे सांगितले आहे. अनुभवी स्टीफन फ्लेमिंग व कुमार संगकाराही प्रशिक्षकपदासाठी फारसे उत्सुक नाहीत. अशातच भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शर्यतीत गोतम गंभीरचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणे हे आमच्यासाठी एक आव्हान आहे. भारतीय क्रिकेटची रचना ज्या खेळाडूंना माहिती आहे. ज्यांनी सर्व फॉरमॅटमध्ये प्रगती केली आहे, अशातच व्यक्तींना निवडण्याचा आमचा कल असल्याचे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉटिंग व जस्टीन लँगरने वैयक्तिक कारण देत प्रशिक्षकपदासाठी नकार दिला होता. यावर मी किंवा बीसीसीआयने कोणत्याही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूशी संपर्क साधलाच नसल्याचे सांगत जय शहा यांनी लँगर आणि पाँटिंगला तोंडघशी पाडले आहे.

Advertisement

दरम्यान, राहुल द्रविड यांचा कार्यकाळ आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर समाप्त होणार आहे. ते भारतीय संघाशी त्यांचा करार वाढवू इच्छित नाहीत. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून 27 मे रोजी याची अंतिम मुदत आहे. यादरम्यान, अनुभवी स्टीफन फ्लेमिंग व श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकार हे दोघेही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी फारसे उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरचे नाव प्रशिक्षकपदासाठी पुढे आले आहे. गौतम गंभीर सध्या केकेआरचा मेंटॉर आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, केकेआर संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला. याआधी गंभीरनं दोन वेळा केकेआरला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले आहे. अर्थात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोचिंगचा अनुभव नाही. पण त्याला भारतीय क्रिकेट समजते. यामुळे आगामी काळात गंभीरच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची धुरा पडणार की अन्य कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.