For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात 14,231 कोटी रुपये बाजारातून काढले

06:13 AM May 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात 14 231 कोटी रुपये बाजारातून काढले
Advertisement

 एनएसडीएलची माहिती : फक्त फेब्रुवारीत रक्कम गुंतवली

Advertisement

वृत्तसंस्था/दिल्ली

विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यामध्ये आतापर्यंत 14 हजार 231 कोटी रुपयांची रुपये बाजारातून काढून घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2026 मध्ये पाहता आतापर्यंत 2लाख कोटी रुपयांचे समभाग गुंतवणूकदारांनी विक्री केले असल्याचे समजते.

Advertisement

2026मध्ये किती रक्कम काढली

गेल्या महिन्यापासून जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी खरेदी ऐवजी विक्रीवरच अधिक भर दिला आहे. 2026 वर्षामध्ये आत्तापर्यंत पाहता 2 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेण्यात आले आहेत. एनएसडीएल (नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड)यांच्या माहितीनुसार एकट्या मे महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत बाजारातून 14 हजार 231 कोटी रुपये काढले आहेत.

विक्रीवर यंदा जास्त दबाव

2025 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी जास्त दबाव पाहायला मिळतो आहे. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 1.66 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले होते. 2026 मध्ये आत्ताच दोन लाख कोटी रुपयांचा आकडा पार झाला आहे. शेअर बाजारात सध्याला फक्त विक्रीवरच भर दिला जात असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळते.

 कशी राहिली महिनावार कामगिरी

एक लक्षात घ्या की यावर्षी फक्त फेब्रुवारी महिन्यात शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली होती. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली होती. सदरचा महिना नकारात्मक राहिला होता. जानेवारी महिन्यात 35 हजार 962 कोटी रुपयांचे समभाग विक्री करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात 22615 कोटी रुपयांच्या समभागांची विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केली होती. गेल्या 17 महिन्यानंतरचा हा खरेदीचा सर्वोत्तम महिना मानला जातो. मार्च महिन्यात पाहता विक्रमी 1.17 लाख कोटी रुपये शेअर बाजारामधून काढून घेण्यात आले आहेत. एप्रिल महिन्यात जवळपास 60847 कोटी रुपये काढून घेण्यात आले.

Advertisement
Tags :

.