For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 3.05 लाख कोटी

06:46 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढले 3 05 लाख कोटी
Advertisement

नऊ महिन्यातील आकडेवारी : आतापर्यंतचा पैसे काढण्याचा विक्रम मोडला

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचे सुरुच ठेवले आहे. 2026 च्या 9 महिन्यांत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी इक्विटी बाजारातून 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. ही रक्कम मागील कोणत्याही पूर्ण वर्षातील पैसे काढण्याच्या विक्रमापेक्षा जास्त आहे. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, 2026 मध्ये आतापर्यंत एफपीएलएसने भारतीय शेअर्समधून 3.05 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. यापूर्वी, 2025 मध्ये 2.4 लाख कोटी रुपये आणि 2024 मध्ये 1.21 लाख कोटी रुपये काढण्यात आले होते. म्हणजेच, यावर्षी विदेशी गुंतवणूकदारांची विक्री आतापर्यंतच्या तुलनेत खूपच जास्त झाली आहे.

Advertisement

9 पैकी 6 महिने परदेशी गुंतवणूकदारांनी विक्री केली

2026 च्या पहिल्या 9 महिन्यांपैकी 6 महिने एफपीआयने भारतीय स्टॉक्सची विक्री केली आहे. दरम्यान, तैवान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारांमधील एआय-संबंधित स्टॉक्समधील तेजीमुळे परदेशी गुंतवणूकदारांना आपले पैसे इतरत्र गुंतवण्यास प्रवृत्त केले. जुलै आणि ऑगस्टमध्ये चित्र थोडे वेगळे होते. या दोन महिन्यांत एफपीआयने भारतीय स्टॉक्समध्ये एकूण 46,180 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या काळात तैवान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारांच्या वाढीचा वेग मंदावला होता.

सप्टेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन पुन्हा एकदा बदलला. एफपीआयने या महिन्यात भारतीय बाजारात सुमारे 33,000 कोटी रुपयांचे बॉण्ड्स विकले. दरम्यान, मध्य पूर्वेतील सुरू असलेला संघर्ष, अमेरिकन बॉण्ड यील्ड्समधील वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यांचा बाजारावर प्रभाव पडला. याशिवाय, दक्षिण कोरिया आणि तैवानच्या बाजारांमध्ये गुंतवणूकदारांची आवड पुन्हा वाढल्याने परदेशी पैसा भारतातून बाहेर गेला.

कच्च्या तेलाच्या किमतींमुळे चिंता वाढू शकते

तज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे भारताचे आयात बिल वाढू शकते. याचा कंपन्यांच्या नफ्यावर आणि मार्जिनवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे कंपन्यांच्या कमाईबाबत परदेशी गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढू शकते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी आणि इन्स्टिट्यूशनल इक्विटीज विभागाचे सेल्स हेड, गौतम दुग्गर यांच्या मते, जोपर्यंत जागतिक बॉण्ड यील्ड्स, व्याजदर यांबाबत अधिक स्पष्टता येत नाही आणि अमेरिकन डॉलर व कच्च्या तेलाच्या किमती नियंत्रणात येत नाहीत, तोपर्यंत एफपीआय गुंतवणुकीत मोठी सुधारणा होणार नाही.

Advertisement
Tags :

.