विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारातून काढले 44 हजार कोटी
वृत्तसंस्था, मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारातून पैसे काढून घेण्याचा सिलसिला सुरुच ठेवला असून ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 44 हजार कोटीपेक्षा अधिक रक्कम काढून घेण्यात आल्याची माहिती आहे. ऑक्टोबर महिन्यात 44 हजार 166 कोटी रुपये बाजारातून विदेशी गुंतवणुकदारांनी काढून घेतले आहेत. यायोगे एकंदर वर्ष 2026 मध्ये पाहता आतापर्यंत गुंतवणूकदारांनी 3.04 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत.
कच्च्या तेलाची वाढती किमत, अमेरिकन डॉलरची मजबूती व 10 वर्षाच्या अमेरिकी बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ यातून विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढण्यावर भर दिला होता. दुसरीकडे उत्तर आशियाई बाजारात एआयसंबंधीत कंपन्यांमध्ये आलेली तेजी पाहून विदेशी गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा त्याकडे वळवला आहे. एनएसडीएल यांच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या आधी सप्टेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 35,861 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली होती. याआधी जुलैमध्ये पाहता विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात 20,200 कोटी रुपये व ऑगस्टमध्ये 29,631 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. 2025 मध्ये एकंदर 1.66 लाख कोटी रुपये बाजारातून काढून घेण्यात आले होते, पण 2026 मध्ये आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. म्हणजेच मागच्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट रक्कम बाजारातून काढून घेण्यात आली आहे.
निफ्टी 13 टक्के घसरणीत
जियोजित इन्वेस्टमेंटसचे व्ही के विजयकुमार यांनी सांगितले की विदेशी गुंतवणूकदारांनी यंदा पैसे काढून घेण्यावर भर दिला. यामुळे निफ्टी निर्देशांकाचे प्रदर्शन खराब राहिले होते. 2026 मध्ये पाहता आतापर्यंत निफ्टी 13 टक्के इतका घसरला आहे. अमेरिकी बाँड यिल्ड जोवर अधिक राहिल तोवर विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेण्यावर जोर देतील.
2026 मध्ये गुंतवणूकदारांनी काढलेली रक्कम
जानेवारी 35,962 कोटी
मार्च 1.17 लाख कोटी
एप्रिल 60847 कोटी
मे 32963 कोटी
जून 49,340 कोटी
सप्टेंबर 35861 कोटी
ऑक्टोबर (आतापर्यंत) 44166 कोटी
