For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना वाचवण्यासाठी बोलावली विदेशी मदत

06:45 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना वाचवण्यासाठी बोलावली विदेशी मदत
Advertisement

हॉलंडमधून अत्याधुनिक ड्रिलिंग मशीन दाखल : उत्तरकाशीतील बचावकार्यावर तज्ञांच्या समितीची नजर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, उत्तरकाशी

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी परदेशी तज्ञांची मदत घेतली जात आहे. शनिवारी अभियांत्रिकी तज्ञ अरमांडो पॅपेलन आणि मायक्रोटनेलिंग तज्ञ ख्रिस कूपर देखील बचावकार्यात मदत करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. तसेच आता हॉलंडमधून मागविण्यात आलेली ड्रिलिंग मशीनही दाखल झाली असून बचावमार्ग खोदण्याचे काम सुरू झाले आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजल्यापासून बंद करण्यात आलेले सिलक्मयारा बाजूचे खोदकाम रविवारी दुपारी 4 वाजता म्हणजेच 50 तासांनंतर पुन्हा सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आतमध्ये अन्न पाठवण्यासाठी आणखी एक छोटा पाईप ड्रिल केला जात आहे.

Advertisement

भुयारामध्ये अडकलेल्या सर्व मजुरांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. येथे बोगदा कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकून पडले आहेत. सध्या केंद्र आणि राज्यातील एकूण सहा पथके पाच योजनांवर काम करत आहेत. यासोबतच पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) उपसचिव मंगेश घिलडियाल, माजी सल्लागार भास्कर खुल्बे, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद आणि भूगर्भशास्त्रज्ञ वऊण अधिकारी यांनीही घटनास्थळी पोहोचून मॅरेथॉन बैठक घेतली. आता एकाचवेळी पाच योजनांवर काम सुरू होणार असल्याचे भास्कर खुल्बे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या सहा एजन्सी एकत्र काम करणार आहेत. या पाच योजनांमध्ये बोगद्याच्या सिलक्मयारा टोकापासून, बरकोट टोकापासून आणि बोगद्याच्या वरच्या, उजव्या व डाव्या बाजूने ड्रिलिंग करून मार्ग तयार केला जाण्यावर विचारमंथन व प्रत्यक्ष काम सुरू आहे.

एकीकडे उभा बोगदा करून कामगारांना बाहेर काढण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे, तर दुसरीकडे जुने ऑजर मशीनही चालवण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी कंपनामुळे मशीन बंद पडली. मात्र शनिवारी मशीनवर दबाव निर्माण करण्यासाठी मोठमोठे खडक आणण्यात आल्यावर खोदकाम सुरू करण्यात आले.

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत!

कामगारांना बाहेर काढण्यासाठी जगात शोधलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. आम्ही त्यांना लवकरच बाहेर काढू. मी स्वत: घटनास्थळी जात आहे.

- पुष्करसिंग धामी, मुख्यमंत्री

प्रत्येक पर्यायाची चाचपणी!

कामगारांना वाचवण्यासाठी आम्ही सर्व पर्याय शोधत आहोत. आपल्याकडे संसाधने, पर्याय आणि पद्धती यांची कमतरता नाही. व्हर्टिकल ड्रिलिंगचा पर्यायही खुला आहे. आम्ही परदेशी सल्लागारांची मदत घेत आहोत. ही मोहीम लवकरात लवकर पूर्ण करा असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे.

- भास्कर खुल्बे, पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार

Advertisement
Tags :

.