कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरन्यायाधीशांच्या शपथविधीला विदेशी पाहुण्यांची मांदियाळी

06:36 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सात देशांचे मुख्य न्यायाधीश कुटुंबियांसह उपस्थित राहणार- न्यायमूर्ती सूर्यकांत आज पदभार स्वीकारणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारी पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभाला भारतातील मान्यवर तसेच विविध देशांतील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उपस्थित राहतील. विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे वयोमर्यादा पूर्ण झाल्यामुळे रविवार, 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. आता सोमवारी राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या समारंभात नवनियुक्त सरन्यायाधीशांच्या शपथविधीचा सोहळा विदेशी पाहुण्यांसह विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सरन्यायाधीशांच्या शपथविधी समारंभाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात सोमवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंका अशा सात देशांचे मुख्य न्यायाधीश त्यांच्या कुटुंबीयांसह उपस्थित राहतील. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशांच्या शपथविधी सोहळ्याला इतर देशांचे इतक्या मोठ्या संख्येने न्यायिक शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.

हरियाणातील पहिले सरन्यायाधीश ठरणार

भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्या. सूर्यकांत यांची अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा केंद्रीय कायदा विभागाने गेल्या महिन्यातच केली होती. त्यांच्या नावाची शिफारस प्रथेप्रमाणे मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केल्यानंतर ती केंद्र सरकारने मान्य केली होती. सूर्यकांत हे हरियाणामधील रहिवासी असलेले पहिले सरन्यायाधीश ठरणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देणार आहेत. सूर्यकांत यांचा कार्यकाळ 24 नोव्हेंबर 2025 ते 9 फेब्रुवारी 2027 असा साधारणत: साडेचौदा महिन्यांचा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

कुटुंबियांनाही समारंभात मानाचे स्थान

न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे संपूर्ण कुटुंब हिसारमधील पेटवाड गावात राहते. त्यांचे मोठे भाऊ मास्टर ऋषिकांत हे त्यांच्या कुटुंबासह गावात राहतात, तर एक भाऊ हिसार शहरात राहतो आणि तिसरा भाऊ दिल्लीत राहतो. सूर्यकांत यांच्या ऋषिकांत, शिवकांत आणि देवकांत या अन्य तीन बंधूंनाही समारंभात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पत्नी सविता सूर्यकांत या महाविद्यालयीन प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्यासह मुग्धा आणि कनुप्रिया या त्यांच्या दोन कन्याही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

विदेशी पाहुणे...

भूतानचे सरन्यायाधीश लियोंपो नोर्बू त्शेरिंग

ब्राझीलचे सरन्यायाधीश एडसन फाचिन

केनियाचे सरन्यायाधीश मार्था कूम

केनियाच्या न्यायमूर्ती सुसान नजोकी

मलेशियाच्या न्यायमूर्ती नलिनी पथ्मनाथन

मॉरिशसच्या सरन्यायाधीश बीबी रेहाना मुंगली-गुलबुल

नेपाळचे सरन्यायाधीश प्रकाश मान सिंह राऊत

नेपाळच्या न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला

नेपाळचे माजी न्यायमूर्ती अनिल कुमार सिन्हा

श्रीलंकेचे सरन्यायाधीश पी. पद्मन सुरेसेन

श्रीलंकेचे न्यायमूर्ती एस. थुरैराजा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article