For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठा नव्या विक्रमी स्तरावर पोहचला

06:13 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठा  नव्या विक्रमी स्तरावर पोहचला
Advertisement

मुंबई :

Advertisement

17 मेला संपलेल्या आठवड्यामध्ये सलग तिसऱ्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. अशा प्रकारे भारतातील विदेशी चलन साठा 648.7 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. सदरच्या आठवड्यामध्ये भारतीय विदेशी चलन साठा 4.549 अब्ज डॉलरने वाढून 648.7 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. याआधी विदेशी चलन साठा 5 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये 648.562 अब्ज डॉलर इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला होता. दुसरीकडे सदरच्या आठवड्यामध्ये देशाचा सुवर्णसाठा 1.244 अब्ज डॉलर्सने वाढून 57.195 डॉलर्सवर पोहोचला होता.

आदित्य बिर्ला समूहाचे बाजारमूल्य 100 अब्ज डॉलरपार

Advertisement

मुंबई : आदित्य बिर्ला समूहाचे बाजार भांडवल मूल्य 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. आदित्य बिर्ला समूहातील कंपन्यांचे बीएसईवरील संयुक्त बाजार भांडवल मूल्य 8 लाख 51 हजार 460.25 कोटी इतके नोंदले गेले होते. त्यानंतर संयुक्त पद्धतीने पाहता शुक्रवारी बाजार मूल्य 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्यावर पोहचले होते.

यांचा आहे समावेश

आदित्य बिर्ला समूहात सिमेंट, फॅशनसह विविध व्यवसायाच्या कंपन्यांचा समावेश आहे. आदित्य बिर्ला समूहामध्ये अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासिम, हिंडाल्को, आदित्य बिर्ला कॅपिटल, आदित्य बिर्ला सनलाइफ एएमसी, व्होडाफोन आयडिया, आदित्य बिर्ला  फॅशन अँड रिटेल, टीसीएनएस क्लोदिंग, आदित्य बिर्ला मनी, सेंच्युरी टेक्सटाइल्स, सेंचुरी एंका आणि पिलानी इन्व्हेस्टमेंट यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :

.