For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाचा विदेशी चलन साठा 650 अब्ज डॉलर्सवर

06:29 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशाचा विदेशी चलन साठा  650 अब्ज डॉलर्सवर
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असून देशाचा विदेशी चलन साठासुद्धा नव्या विक्रमासह कामगिरी करताना दिसला आहे. विदेशी चलन साठा आता 650 अब्ज डॉलर्सवर पोहचला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एकापाठोपाठ एक सकारात्मक बाबी घडताना दिसत आहेत. जीडीपीच्या आकडेवारीमध्ये वाढ होत असून सरकारी उत्पन्नामध्येदेखील  करांचा वाटा लक्षणीयरित्या वाढतो आहे. भारतीय शेअर बाजारसुद्धा सातत्याने नव्या विक्रमासह झळाळताना दिसत आहे. नव्या सरकारच्या बाबतीतील अस्थिरता बऱ्याचअंशी कमी झाली असून शेअर बाजार पुन्हा एकदा नव्या दिशेने वाटचाल करताना दिसतो आहे. दुसरीकडे देशातील विदेशी चलन साठ्यामध्ये पुन्हा एकदा विक्रमी वाढ नोंदवली गेल्याचे दिसून आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली असून देशाचा विदेशी चलन साठा 650 अब्ज डॉलरच्या नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.

Advertisement

31 मे 2024 संपलेल्या आठवड्यामध्ये देशातील विदेशी चलन साठा 651.510 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. सदरचा स्तर हा विक्रमी स्तर असल्याचे सांगितले जात आहे. साठ्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेमध्ये 4.83 अब्ज डॉलरची वाढ दिसून आली आहे. विदेशी चलन मालमत्ता 572.56 अब्ज डॉलरवर पोहोचली.

Advertisement
Tags :

.