For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात 3.668 अब्ज डॉलर्सने वाढ

06:08 AM May 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात 3 668 अब्ज डॉलर्सने वाढ
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

3 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 3.668 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. या योगे विदेशी चलन साठा 3 मे अखेर 641.59 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. एक लक्षात घ्या की, या आधीच्या सलग तीन आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये घसरण अनुभवायला मिळाली होती.

26 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये चलन साठ्यात 2.412 अब्ज डॉलर्सची घसरण दिसली होती. सलग तीन आठवड्यांमध्ये एकंदर चलन साठ्यामध्ये 10.6 अब्ज डॉलर्सची घसरण दिसून आली. 5 एप्रिल रोजी तर विदेशी चलन साठ्याने 648.562 अब्ज डॉलरचा सर्वोच्च स्तर गाठला होता. नव्या स्तराने सप्टेंबर 2021 मध्ये नोंदवलेल्या 642.453 अब्ज डॉलर्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

Advertisement

 सुवर्ण साठा घसरला

याच दरम्यान देशाच्या सुवर्णसाठ्यामध्ये मात्र सदरच्या आठवड्यामध्ये 6.53 अब्ज डॉलर्सची घसरण झाली आहे. देशाचा सुवर्ण साठा यायोगे 54.88 अब्ज डॉलरवर खाली आला आहे.

Advertisement
Tags :

.