महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विदेशी चलन साठ्यात तिसऱ्यांदा वाढ

06:28 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

विदेशी चलन साठा सलग तिसऱ्या आठवड्यामध्ये वाढलेला दिसून आला आहे. सध्याला हा विदेशी चलन साठा 620.44 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. मागच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 4.47 अब्ज डॉलरने वाढला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे. यायोगे विदेशी चलन साठा 620.441 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. 21 महिन्यानंतर विदेशी चलन साठ्याने सर्वोच्च पातळी गाठली आहे. गेल्या तीन आठवड्यामध्ये सलगपणे विदेशी चलन साठा वाढला असल्याची बाबही समोर आली आहे. 22 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये 4.471 अब्ज डॉलर इतकी चलन साठ्यामध्ये वाढ झाली. यायोगे त्या आठवड्यात विदेशी चलन 620.441 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 9.112 अब्ज डॉलर्सने वाढून 615.971 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. यापूर्वी 2021 मध्ये विदेशी चलन साठा 645 अब्ज डॉलर्स इतक्या विक्रमी स्तरावरती पोहोचला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article