For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात 9.905 अब्ज डॉलर्सची वाढ

06:50 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात 9 905 अब्ज डॉलर्सची वाढ
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात 9.905 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यायोगे देशाचा विदेशी चलन साठा आता 716.907 अब्ज डॉलर्सचा झाला आहे. याचबरोबर देशाच्या सुवर्ण साठ्यातही सदरच्या आठवड्यात वाढ झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. याआधीच्या म्हणजेच 7 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठा 4.136 अब्ज डॉलर्सने वाढत 707.002 अब्ज डॉलर्सवर पोहचला होता. लक्षात घ्या की यावर्षी 27 फेब्रुवारीच्या आठवड्यात देशाच्या विदेशी चलन साठ्याने 728 अब्ज डॉलर्सचा विक्रमी टप्पा गाठला होता. पण त्यानंतर पश्चिम आशियाई संकटाने शेअरबाजारावर दबाव निर्माण केला. रुपयावर दबाव वाढल्याने रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात डॉलरची विक्री करुन हस्तक्षेप करावा लागला. सुवर्ण साठ्यात 1.679 अब्ज डॉलर्सची वाढ होत हा साठा 111.417 अब्ज डॉलर्सवर पोहचला.

Advertisement

Advertisement
Tags :

.