विदेशी चलन साठ्यात 305 दशलक्ष डॉलर्सची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
14 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 305 दशलक्ष डॉलर्सने वाढून 654.271 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये 15.267 अब्ज डॉलरची भर पडली होती आणि त्यावेळी विदेशी चलन साठा 653.966 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. ही वाढ दोन वर्षांमधली आठवड्यातली सर्वाधिक वाढ होती अशीही माहिती रिझर्व बँकेने दिली आहे.
विदेशातील अस्थिर स्थिती त्याचप्रमाणे कमकुवत रुपयामुळे विदेशी चलन साठ्यामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये घसरणीचा अनुभव पाहायला मिळाला होता. मात्र आता विदेशातील स्थितीमध्ये सुधारणा झाली असून रूपयाही सुधारत असून परिणामी विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ पाहायला मिळते आहे.
सुवर्ण साठाही वाढला
सप्टेंबर 2024 मध्ये विदेशी चलन साठा 704.885 अब्ज डॉलर्स इतक्या सर्वकालिक उच्चांकावरती पोहोचला होता. 14 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा सुवर्ण साठा 66 दशलक्ष डॉलर्सने वाढून 74.391 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.