For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विदेशी चलन साठ्यात 8.478 अब्ज डॉलर्सची घसरण

06:29 AM Dec 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
विदेशी चलन साठ्यात 8 478 अब्ज डॉलर्सची घसरण
Advertisement

मुंबई :

Advertisement

गेल्या काही आठवड्यापासून विदेशी चलन साठ्यामध्ये घसरणीचा सिलसिला राहिला असून रुपया देखील नीचांकी स्तरावर घसरलेला पाहायला मिळाला. 20 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 8.478 अब्ज डॉलर्सने कमी होऊन 644.391 अब्ज डॉलरवर घसरला होता. रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यात पाहता विदेशी चलन साठ्यामध्ये 1.988 अब्ज डॉलर्सची घसरण झाली होती आणि त्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 652.869 अब्ज डॉलरवर घसरला होता. सप्टेंबरअखेर विदेशी चलन साठा 704.885 अब्ज डॉलरवर सर्वकालिक स्तरावरती होता. सुवर्ण साठा 2.33 अब्ज डॉलर्सने घटत 65.726 अब्ज डॉलर्सवर राहिला होता.

....

Advertisement

Advertisement
Tags :

.