विदेशी चलन साठा घटला
06:03 AM Aug 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
26 जुलैला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 3.471अब्ज डॉलर्सने घटत 667.386 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 4.003 अब्ज डॉलर्सने वाढून 670.386 अब्ज डॉलर्स या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. 26 जुलैला संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन मालमत्ता 1.171 अब्ज डॉलर्सने घटून 586.877 अब्ज डॉलर्सवर राहिली होती. याचप्रमाणे सुवर्ण साठ्यातही 26 जुलैच्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली. देशाचा सुवर्ण साठा 2.297 अब्ज डॉलर्सने घटून 57.695 अब्ज डॉलर्सवर राहिला होता.
Advertisement
Advertisement
Next Article