फोर्ड भारतात करणार इंजिनची निर्मिती, 3250 कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेन वाहन निर्माती कंपनी फोर्ड चेन्नईमध्ये आपल्या कारखान्यामध्ये पॉवरट्रेन इंजिनची निर्मिती करण्यासाठी तयार झाली आहे. सदरच्या योजनेसाठी कंपनीने 3250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचेही ठरवले आहे. फोर्ड ही कंपनी पुढील पिढीसाठी लागणाऱ्या इंजिनची निर्मिती करणार आहे. अमेरिकेबाहेर पाहता फोर्डचा हा भारतातला पहिला पॉवरट्रेन इंजिन निर्मिती कारखाना असणार आहे.
कधी होणार उत्पादन सुरु
चेन्नईमधील आपल्या कारखान्यामधून इंजिनच्या निर्मिती कार्याला 2029पासून सुरुवात करू शकते. वर्षाकाठी 2 लाख 35 हजार इंजिनची निर्मिती करण्याची योजना कंपनीने बनवली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये फोर्ड कंपनी आणि तामिळनाडू सरकार यांच्यामध्ये सहकार्याचा करार करण्यात आला होता.
करार आणि इंजिनचा वापर
फोर्डचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तामिळनाडूत राज्याचे मुख्यमंत्री एम के स्टालीन यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. कंपनीच्या कारखान्यात तयार होणाऱ्या इंजिनचा वापर हा दक्षिण पूर्व आशियाई बाजारात निर्यात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी केला जाणार आहे.
महत्त्वाचे...
? चेन्नईतील कारखान्यात पॉवरट्रेन इंजिनची निर्मिती
? 2029 पासून सुरु होणार उत्पादन अमेरिकेबाहेर भारतातला पहिला कारखाना
? 2 लाख 35 हजार इंजिन्सची होणार निर्मिती