भाड्याने दिलेल्या रिसॉर्टचा जबरदस्तीने ताबा
रत्नागिरी :
तालुक्यातील जयगड परिसरातील नांदिवडे येथे भाड्याने दिलेले रिसॉर्ट मुदतीपूर्वी जबरदस्तीने ताब्यात घेवून 9 लाख रुपयांची फसवणूक केल़ी तसेच महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना 6 जानेवारी ते 20 मे 2025 दरम्यानच्या काळात घडल़ी या प्रकरणी जयगड पोलिसात महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा
ड़ॉ. योगेश मनमोहन जोग व मनमोहन जोग (ऱा नांदिवडे, ता. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ नांदिवडे येथे संशयितांच्या मालकीचे रिसॉर्ट असून ते 6 जानेवारी 2025 पासून तक्रारदार यांना करारावर चालविण्यासाठी दिले होत़े दरम्यान तक्रारदार यांचे पती आजारी पडल्याने त्यांनी दोन महिने आधी हे रिसॉर्ट सोडणार असल्याचे संशयित आरोपींना सांगितल़े असे असतानाही मुदतीपूर्वीच संशयित आरोपींनी रिसॉर्टचा जबरदस्तीने ताबा घेतल़ा तसेच डिपॉझिट घेतलेली रक्कम तक्रारदार यांना परत केली नाह़ी त्याचप्रमाणे रिसॉर्टमधील तक्रारदार यांच्या साहित्याचाही ताबा घेवून एकूण 9 लाख रुपयांची फसवणूक केली, असा आरोप महिलेकडून करण्यात आला आह़े तसेच संशयित मनमोहन जोग यांनी तक्रारदार महिलेला तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले, अशी तक्रार जयगड पोलिसात दाखल करण्यात आली आह़े या प्रकरणी पोलिसांनी आरोपी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 318(4),75,79,3(5) नुसार गुन्हा दाखल केल़ा.