फोर्स मोटर्सच्या विक्रीत 19 टक्के वाढ
नवी दिल्ली : फोर्स मोटर्सने मे मधील वाहन विक्रीचा अहवाल सादर केला असून देशांतर्गत वाहन विक्रीत कंपनीने 24 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. तर एकूण वाहन विक्रीत मेमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 19 टक्के वाढ नोंद केलीय. पण दुसरीकडे कंपनीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. या स्मॉलकॅप कंपनीचा समभाग बुधवारी बाजारात 3 टक्के वाढीसोबत बंद झाला. विक्रीतील आकडेवारीचा सकारात्मक परिणाम पुढील सत्रातही दिसू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार छोट्या व्यावसायिक वाहने, हलकी व्यावसायिक वाहने, युटिलीटी वाहने आणि स्पोर्टस् युटिलीटी वाहने यांचा एकंदर वाहनांमध्ये समावेश आहे. कंपनीने मे मध्ये 3088 वाहनांची विक्री नोंदवली आहे. मागच्या तुलनेत वाढ 19 टक्के अधिक आहे. तर कंपनीच्या वाहन निर्यातीत मात्र 52 टक्के इतकी घसरण दिसली आहे. मागच्या वर्षी 180 वाहनांची निर्यात करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा 86 वाहनांची निर्यात करण्यात आली आहे. देशांतर्गत वाहन विक्री पाहता 24 टक्के वाढीसोबत 3002 वर पोहचली आहे. जी मागच्या वर्षी 2412 इतकी वाहन विक्री होती. समभाग यादरम्यान 2.72 टक्के वाढीसोबत 12333 रुपयांवर बंद झाला. समभाग एक महिन्यामागे 10176 रुपयांवर होता. महिन्यात 21 टक्के इतका समभाग वाढला होता.