महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विविध मागण्यांसाठी जि. पं. कार्यालयासमोर निदर्शने

12:05 PM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रा. पं. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लावा

Advertisement

बेळगाव : सर्वसामान्य जनतेला 70 टक्के सेवा या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राम पंचायतीद्वारे पुरविल्या जातात. मात्र, ग्राम पंचायतमधील पीडीओ, सचिव, द्वितीय श्रेणीतील लेखा साहाय्यक, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या मागणीकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मार्गी लागाव्यात, यासाठी 2 ऑक्टोबरपासून राज्यभरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सेवा बंद ठेवून बेमुदत संप पुकारला होता. तातडीने पीडीओ व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी सोमवारी पीडीओ, कर्मचारी संघटनेतर्फे जि. पं. कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले.

Advertisement

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बदली, बढती, वेतन आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची बढती आदी मागण्यांसाठी आंदोलन केले. दरम्यान, जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्या समजून घेतल्या. पंचायत विकास अधिकारी, सचिव आणि इतर कर्मचाऱ्यांचा मागील वर्षभरात मानसिक तणाव आणि इतर कारणांनी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबासमोर अडचणी वाढल्या आहेत. ग्राम पंचायत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण कमी करण्यात यावा आणि इतर मागण्याही पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी आंदोलनकत्यर्नीं केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article