जिल्ह्यात प्रथमच आढळल्या पट्टेरी वाघाच्या पाऊलखुणा !
12:15 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
Advertisement
चिपळूण :
Advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी प्रथमच पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा चिपळूण तालुक्यातील तळसरच्या जंगलात आढळून आल्या आहेत. म्हैशींची शिकार करून खाण्याची पद्धत, पंजाच्या ठशांचा आकार लक्षात घेता तो वाघच असल्याचे प्राथमिक शिक्कामोर्तब झाले असून वनविभागाने तात्काळ ५ कॅमेरे ट्रॅप या जंगलात बसवले आहेत. त्यामध्ये तो दिसल्यानंतरच त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'एसटीआर-टी १' हा वाघ खाली तळसरच्या जंगलात उतरल्याची शक्यता वन्यप्राणी अभ्यासक आणि व्याघ्र प्रकल्प प्रशासनातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. या सुखद वार्तेने वन्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे.
Advertisement
Advertisement