कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रथमच संगणक प्रणालीव्दारे उत्तरपत्रिका तपासणी

11:13 AM Dec 23, 2024 IST | Pooja Marathe
For the first time, the answer sheets will be checked through a computer system
Advertisement

एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी.च्या 15 ते 20 लाख उत्तरपत्रिका तपासल्या जाणार
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून पहिलाच प्रयत्न
कोल्हापूरः अहिल्या परकाळे

Advertisement

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सुरू असलेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबर हिवाळी सत्रातील परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ( Digital Evaluation System ) या संगणकीय प्रणालीव्दारे होणार आहे. राज्यातील काही मोजक्या विद्यापीठांमध्ये ही पध्दत वापरली जाते. आता विद्यापीठातील पदव्युत्तरच्या एम. ए., एम. कॉम. आणि एम. एस्सी.च्या 34 अभ्यासक्रमाच्या 2 लाख 50 हजारहून अधिक विद्यार्थ्यांच्या 15 ते 20 लाख उत्तरपत्रिका संगणक प्रणालीव्दारे तपासल्या जाणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची संगणकीय तपासणी करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

Advertisement

संगणकीय प्रणालीद्वारे काही निवडक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासल्या जाणार आहेत. भविष्यात उर्वरित पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी ही पध्दत वापरली जाणार आहे. सध्या विद्यापीठांमधील अधिविभागात व संलग्नित महाविद्यालयात 34 पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जातात. या अभ्यासक्रमांच्या 800 परीक्षांना 2 लाख 50 हजार विद्यार्थी बसतात. पारंपरिक पध्दतीने उत्तरपत्रिकांची तपासणी होते. कमी मनुष्यबळ अन येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठीच विद्यापीठाने संगणक प्रणालीव्दारे उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेतला आहे. येथे प्राध्यापकाकडून एखादा प्रश्न तपासायचा राहिला किंवा तपासलेल्या प्रश्नांचे गुण द्यायचे राहिले तर संगणक तत्काळ सूचना देईल. तसेच संगणकाच्या माध्यमातून बिनचूक निकाल जाहीर करण्यास मदत होईल, असा दावा शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

संगणक प्रणालीमध्ये उत्तरपत्रिका स्कॅन करून त्याचे रूपांतर पीडीएफमध्ये केले जाईल. त्यानंतर पीडीएफ उत्तरपत्रिकेला एक सांकेतिक क्रमांक देऊन ती संबंधित विषयाच्या फोल्डरमध्ये समाविष्ट केल्यावर संगणक प्रणालीमध्ये जाईल. प्रणालीमध्ये प्रश्न पत्रिकेचे स्वरूप, आदर्श उत्तरपत्रिका, गुणदान पध्दत, परीक्षकांचे विषय निश्चित केलेले असतील. त्यामुळे परीक्षकांना त्यांच्या विषयांच्या उत्तरपत्रिका त्यांच्या लॉगईनमध्ये उपलब्ध होतील. संबंधित परीक्षकांने लॉगईन केल्यानंतर त्यांच्या विषयांमधील ज्या विषयाच्या उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत, तो विषय निवडल्यानंतर संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध असणाऱ्या एकूण उत्तरपत्रिकांपैकी रँडम पध्दतीने एक उत्तरपत्रिका तपासण्यासाठी उपलब्ध होईल. त्या उत्तरपत्रिकेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर दुसरी उत्तरपत्रिका उपलब्ध होईल. मूल्यमापन करताना परीक्षक या प्रणालीमध्ये उपलब्ध असणाऱ्या प्रश्नपत्रिका, आदर्श उत्तरपत्रिका, प्रश्ननिहाय गुणांचा वापर करू शकतात. परीक्षकांना उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्यांनी लिहिलेले उत्तर वाचून गुण देण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशा प्रकारे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तपासले जाईल. एखादा प्रश्न तपासयाचा राहीला असल्यास किंवा एखाद्या प्रश्नास गुण दिले नसल्यास उत्तरपत्रिका तपासून पूर्ण होणार नाही. या संगणकीय प्रणालीद्वारे निकाल जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून फोटोकॉपी अर्ज प्राप्त झाल्यानंतर कमी कालावधीत विद्यार्थ्यांच्या लॉगईनमध्ये फोटोकॉपी पाठवली जाईल. त्यामुळे पुनर्मूल्यांकन किंवा फेरतपासणी प्रकिया ही कमी वेळेत पूर्ण करून संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता येईल.

संगणक प्रणालीचे फायदे
-मूल्यमापन विभागाकडून प्रत्येक परीक्षेसाठी मूल्यमापन केंद्र निश्चित व संबंधित केंद्रास आवश्यक कॅप संचालक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रकिया रद्द होईल.
-प्रत्येक महाविद्यालय हे मूल्यमापन केंद्र म्हणून कार्यरत राहिल.
-प्रत्येक शिक्षक हा त्यांच्या महाविद्यालय किंवा नजीकच्या महाविद्यालयात मूल्यमापन करु शकतो.
-शिक्षकांच्या वेळेची व प्रवास खर्चाची बचत होईल.
-मूल्यमापनात पारदर्शकता, गोपनीयता, अचूकता व गतिमानता येईल.
-अधिकार मंडळाने मान्यताप्राप्त विषयनिहाय शिक्षकांना मूल्यमापन करणे अनिवार्य राहिल.
-उत्तरपत्रिका तपासणी व गुणांच्या बेरजेमधील त्रुटी राहणार नाहीत.
-कोणत्या शिक्षकांनी किती उत्तरपत्रिका तपासल्या याची माहिती संबंधित अधिकारी व परीक्षा संचालकांना डीशबोर्ड द्वारे समजेल.
-फोटो कापी, पुनर्मूल्यांकन व फेरतपासणी प्रक्रिया गतिमान होईल.

गोपनीयता व निकाल कमी वेळेत जाहीर होणार
ओएसएम या संगणक प्रणालीमुळे मूल्यमापन पद्धतीमध्ये गतिमानता, अचुकता, गोपनीयता राखण्यासाठी मदत होईल. सर्व परीक्षांचे निकाल कमीत कमी वेळेमध्ये जाहीर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर फोटो कॉपी, पुनर्मूल्यांकन व फेरतपासणी प्रकिया कमी कालावधीत पूर्ण करता येईल, याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना निश्चित होईल.
-डॉ. अजितसिंह जाधव (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, शिवाजी विद्यापीठ)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article