कोल्हापुरात प्रथमच होणार महिला क्रिकेट पंच परीक्षा
कोल्हापूर :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पुढील ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये कोल्हापूरात प्रथमच महिला क्रिकेट पंच परिक्षेचे आयोजन केले जात आहे. लेखी, तोंडी व प्रात्याक्षिके अशा स्वरुपात ही परीक्षा होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातून पंच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आजी-माजी महिला खेळाडू व जाणकारांनी httpsë//forms.gle/NY7oBwvkobyT4ukKA या लिंकवर 18 जुलैपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मदन शेळके यांनी केले आहे.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एमसीए फक्त मैदानेच तयार करणार नाही क्रिकेटसाठी लागणारे पंच, कोच, स्कोरर, व्हिडीओ अॅनालिस्ट, पीच क्युरेटरही तयार आहे. त्यासाठी परीक्षांचेही नियोजनपूर्वक आयोजन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले होते. तसेच क्रिकेट संबंधीत सर्व घटकांवर आधारीत विविध सेमीनारही आयोजित केले जातील, असेही सांगितले होते. त्यानुसार सर्व तयारी कऊन कोल्हापूरात एमसीएच्या वतीने महिला क्रिकेट पंच परिक्षेचे आयोजन केले जात आहे.
परीक्षेपूर्वी ऑगस्ट महिन्यात 8 दिवसांच्या कालावधीत क्रिकेट-लॉवर आधारीत महिलांसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने कोर्सचे आयोजन केले जाईल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अथवा सप्टेंबर महिन्याच्या सुऊवातीला लेखी, तोंडी व प्रात्याक्षिके अशा स्वऊपात परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत 100 पैकी 80 अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारी महिलाच उत्तीर्ण माणण्यात येईल. येत्या काही दिवसातच पंच परिक्षेच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जातील. पंच परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या आजी-माजी महिला खेळाडूंनी अधिक माहीतीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममधील कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (केडीसीए) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सचिव मदन शेळके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.