मित्राच्या लग्नासाठी...
प्रत्येक व्यक्तीचे कोणाच्या ना कोणाच्या संबंधात गैरसमज असतात, ही वस्तुस्थिती आहे. तसे असू नयेत, असेही प्रत्येकाला वाटत असते. पण अशा गैरसमजापोटी कोणाचे लाखो रुपये खर्च झाले असतील, तर ती वैशिष्ट्यापूर्ण बाब ठरते. जर्मनीतील एका जोडप्याच्या संदर्भात असा प्रकार घडला आहे. ही एक अद्भूत घटना आहे. हे जोडपे एका लग्नसमारंभासाठी 14 तासांचा विमान प्रवास करुन आणि लाखो रुपये खर्च करुन पोहचले. पण तेथे पोहचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की का विवाह समारंभाचे त्याना आमंत्रणच नव्हते.
ही घटना अमेरिकेतील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली असून ती 2023 मधील असल्याचे स्पष्ट होत आहे. यासेमिन सारली आणि तिचा त्यावेळचा बॉयप्रेंड या जोडप्याने या विवाहाला जाण्यासाठी तयारी केली. हा विवाह अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉसआयर्समध्ये आयोजित करण्यात आली होती. तिच्या बॉयप्रेंडचे आणि या विवाह सोहळ्यातील वराचे काही बोलणे दूरध्वनीवरुन झाले होते. तिच्या मित्राला या वराने सांगितले की हे लग्नाचे आमंत्रण केवळ जवळच्या लोकांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे या जोडप्याचा समज असा झाला की, आपल्याला या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे जोडपे ब्रिटनमधून निम्म्या जगाचा प्रवास करुन या विवाहासाठी अर्जेंटिना देशात पोहचले. पण तेथे गेल्यानंतर त्यांना असे समजले की त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही. त्यामुळे त्यांची बरीच कोंडी झाली. आमंत्रणाशिवाय कार्यक्रमाला जाणे योग्य नव्हते. त्यामुळे ते या विवाहाला, विवाहस्थळी असूनही उपस्थित राहिले नाहीत. केवळ एका गैरसमजापोटी त्यांना हा लाखो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला होता. यासेमिन सारली यांनीच सोशल मिडियावर ही घटना प्रसिद्ध करुन गैरसमज हा कसा हानीकारक असतो ते स्पष्ट केले आहे. त्यांची ही पोस्ट लाखो लोकांनी पाहिली असून अनेकांनी या घटनेवर स्वारस्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण प्रतिक्रियाही मोठ्या संख्येने व्यक्त केल्या आहेत.