For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पेनला फुटबॉलचे सुवर्ण

06:56 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पेनला फुटबॉलचे सुवर्ण
Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

Advertisement

2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनच्या पुरूष फुटबॉल संघाने सुवर्णपदक पटकाविले. शुक्रवारी येथे झालेल्या पुरूष फुटबॉल या क्रीडा प्रकारातील  अंतिम सामन्यात स्पेनने यजमान फ्रान्सचा 5-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.

गेल्या महिन्यात स्पेनच्या फुटबॉल संघाने युरोपियन चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्या स्पर्धेमध्ये ब्राझीलने स्पेनचा पराभव करुन सुवर्णपदक हस्तगत केले होते. ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये पुरूष फुटबॉल या क्रीडा प्रकारात 1992 नंतर सुवर्णपदक मिळविणारा स्पेन हा पहिला युरोपियन देश आहे. 1992 च्या बार्सीलोना ऑलिम्पिक स्पर्धेत असा पराक्रम नोंदविला गेला होता.

Advertisement

स्पेन आणि फ्रान्स यांच्यातील शुक्रवारच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने पिछाडीवरुन मुसंडी मारत स्पेनवर 3-3 अशी बरोबरी साधली गेल्याने हा सामना जादावेळेमध्ये लांबला गेला. जादावेळेच्या कालावधीमध्ये तिसऱ्याच मिनिटाला मॅटेटाने पेनल्टी स्पॉटवरुन स्पेनचा चौथा गोल केला. बदली खेळाडू कॅमेलो कुलीने फ्रान्सच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत आपल्या संघाचा पाचवा आणि शेवटचा गोल नोंदवून फ्रान्सचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.