For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेटावर हेलिकॉप्टरने येते अन्नधान्य

06:10 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेटावर हेलिकॉप्टरने येते अन्नधान्य
Advertisement

नाही कुठला रस्ता अन् मॉल

Advertisement

फरो आयलँड्स डेन्मार्कचा हिस्सा असून हे आइसलँड आणि नॉर्वेदरम्यान अटलांटिक महासागरात वसलेले आहे. येथील स्टोरा डिमुन नावाचे बेट जगातील सर्वात सुंदर आणि सर्वात दुर्गम लोकवस्ती असलेल्या बेटांपैकी एक मानले जाते. या बेटावर एकूण लोकसंख्या केवळ 4-7 लोकांची असून ते देखील एकाच परिवाराचे आहेत. कधीकधी याला 6 लोकांचे बेट म्हटले जाते. येथे कुठलाही रस्ता नाही, मॉल अन् दुकान देखील नाही. पूर्ण बेट केवळ 2.64 चौरस किलोमीटरचे असून याची उंची 396 मीटरपर्यंत आहे.

स्टोरा डिमुनवर पोहोचणे देखील सोपे नाही, येथे कुठलेच बंदर नाही, शांत सागरी वातावरणातच येथे नौका पोहोचू शकते, परंतु बहुतांश वेळी हेलिकॉप्टरच एकमात्र साधन असते. अटलांटिक एअरवेजची हेलिकॉप्टर सेवा आठवड्यात दोन किंवा तीनवेळा येथे येते. हेलिकॉप्टरद्वारेच सर्व अन्नधान्य, भाज्या, दूध, औषधे, शाळेची पुस्तके आणि पत्रं देखील येतात. बेटावर राहणारा परिवार मुख्यत्वे पशुपालनाद्वारे स्वत:चा उदरनिर्वाह करतो.

Advertisement

राहतात केवळ 6 लोक

या बेटावर एक परिवार राहतो, ज्यात 6 लोक सामील आहेत. परिवाराचे लोक ईवा आणि जोगवन जॉन असून त्यांचा परिवार 8 पिढ्यांपासून येथे राहत आहे. या दांपत्याला 3 अपत्यं असून ती शाळेत जातात. परंतु ही शाळा दुसऱ्या बेटवर असल्याने हेलिकॉप्टरनेच जावे लागते. बेटावर वीज सौरऊर्जा आणि जनरेटरने प्राप्त होते. पावसाचे पाणी साठविले जाते, तर इंटरनेटही उपग्रहाच्या मदतीने उपलब्ध होते. तरीही येथील लोक आनंदी आहेत. येथील शांतता आणि निसर्ग सौंदर्य शहराच्या धकाधकीपासून खूपच चांगले असल्याचे ईवा सांगते.

पर्यटकांची वाढती संख्या

पर्यटक आता हेलिकॉप्टर टूर बुक करून येथे दिवसभरासाठी येतात. ते परिवाराच्या घरी निर्मित केक, सॉसेज आणि रुबर्ब जाम खातात आणि बेटाची सैर करतात. परंतु येथील जीवन सोपे नाही. हिवाळ्यात जोरदार वारे आणि अतिवृष्टी होत असते. कधीकधी हेलिकॉप्टर येथे येऊ शकत नाही. तेव्हा परिवाराला स्वत:च स्थिती सांभाळावी लागते. मुले येथे खेळतात, परंतु मित्रांशिवाय. तरीही निसर्गाच्या सान्निध्यात राहणेच सर्वात मोठा दिलासा असल्याचे परिवार सांगतो.

Advertisement
Tags :

.