फूड फेस्टिव्हल रोटरी अन्नोत्सव 2025 चे थाटात उद्घाटन
03:08 PM Jan 04, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
यंदाचे अन्नोत्सव शुक्रवार दि 3 जानेवारी, ते मंगळवार 14 जानेवारी 2025 पर्यंत या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अन्नोत्सवाला बेळगाव तसेच आसपासच्या परिसरातील तब्बल एक लाख वीस हजाराहून अधिक नागरिक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या अन्नोत्सवात विविध प्रकारच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय शाकाहारी आणि मांसाहारी पाककृती, मनोरंजन पार्क आणि दैनंदिन सांस्कृतिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांसह एक आनंददायी अनुभव शहरवासीयांना मिळणार आहे. दरम्यान शनिवार, 4 जानेवारी रोजी सायंकाळी बॉलीवूड शाम नावाचा सांज द बँड द्वारे लाइव्ह परफॉर्मन्स आयोजित करण्यात आला असून नागरिकांना खाण्यासोबत हिंदी चित्रपट सृष्टीतील सदाबहार संगीताची मैफल अनुभवास मिळणार आहे. खाद्यप्रेमींसाठी विविध प्रकारच्या पाककृती आणि मनोरंजनाचा मनमुरादआनंद घेण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने समस्त बेळगावकरांना या उत्सवाला भेट देण्याची विनंती करण्यात आली असून आपला आनंद द्विगुणित करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. भव्य अशा फूड फेस्टिवला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याने, त्यांना आपली वाहने पार्क करण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून येथील प्रशस्त जागेत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच होणाऱ्या गर्दीमुळे कदाचित मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना ऑनलाईन पैसे पाठविण्यात म्हणजेच युपीआय सेवेत व्यत्यय येऊ शकतो , याची नोंद नागरिकांनी आवर्जून घ्यावी असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे. अन्नोत्सवाला भेट देण्यासाठी नागरिकांनी पुढील मार्गाचा अवलंब करावा - पहिला - शहरवासियांना नानावाडीमार्गे सावगाव रोड, दुसरा - राणी चन्नम्मा नगर, हिंदू नगर, टिळकवाडी आणि भाग्यनगर येथील रहिवाशांसाठी मंडोळी रोड हा पर्याय योग्य असेल, तसेच तिसरा - विजयनगर आणि परिसरातील रहिवाशांसाठी महालक्ष्मीनगर हा मार्गे सोयीस्कर ठरणार आहे . रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने चोखंदळ खवय्यांसाठी वर्षातून एकदा अतिभव्य प्रमाणात या अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात येते, त्यामुळे नागरिकांनी आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवून या फूड फेस्टिवलचा लाभ घ्यावा असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
Advertisement
रोटरी अन्नोत्सव २०२५ चे ३ ते १४ जानेवारी अंगडी कॉलेज मैदान, सावगाव रोड, बेळगाव येथे आयोजन
Advertisement
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने बहुप्रतिक्षित असलेल्या रोटरी अन्नोत्सव 2025 चे शुक्रवार दि ३ जानेवारी रोजी सायंकाळी शहरातील सावगाव रोड येथील अंगडी कॉलेज मैदानावर मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमा प्रसंगी माजी खासदार आणि सुरेश अंगडी एज्युकेशन फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगला सुरेश अंगडी, डॉ. स्पुर्ती अंगडी आणि रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन शरद पै यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सुहास चांडक, अन्नोत्सवाचे अध्यक्ष रोटेरियन अक्षय कुलकर्णी, रोटेरियन शैलेश मांगले, सचिव रोटेरियन मनीषा हेरेकर व इतर सन्माननीय रोटरी क्लबचे सदस्य आदींनी सहभाग घेतला होता.
Advertisement
Advertisement
Next Article