वर्धापनदिनानिमित मनपातर्फे खाद्यमहोत्सव
कोल्हापूर :
वर्धापन दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने शुक्रवारपासून खाद्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. ताराबाई पार्क येथील सासने मैदानावर शुक्रवार 13 ते 15 डिसेंबर दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे. याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
महोत्सवामध्ये 100 स्टॉलचे नियोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी बनविलेल्या विविध वस्तूंचीही विक्री व प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यातून बचत गटाच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. महापालिकेसह जिह्यातील नगर परिषद, नगरपालिकांमधील नावीन्य पूर्ण उत्पादने असणाऱ्या महिला बचत गट यामध्ये सहभागी होणार आहेत. महोत्सवात कोल्हापुरातील तांबडा, पांढरा, वडा कोंबडा, बिर्याणी, मटनाचे लाणचे, मिसळ, झुणका भाकर आदी खाद्यपदार्थ्यासह कोल्हापुरी चप्पल, माती, बांबू, हस्तकलेच्या वस्तू, महिलांसाठी इमिटेशन ज्वेलरींचा समावेश असणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.