महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हिलचेअरवरून फूड डिलिव्हरी

06:38 AM Jul 30, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

झोमॅटोसारख्या कंपन्या आपल्याला हवे ते खाण्याचे पदार्थ घरी आणून पोचते करतात. ही सेवा आता नवलाईची राहिलेली नाही. फूड डिलिव्हरी बॉईज ही संकल्पना आता अतिशय सर्वमान्य आहे. या फूड डिलिव्हरी बॉईजकडे दुचाकी असते आणि ते वेगवान प्रकारे खाणे-पिणे लोकांपर्यंत पोहोचविण्याची सेवा बजावत असतात. तथापि, इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये एक व्यक्ती व्हिलचेअरवरून झोमॅटोच्या फूड ऑर्डर्स पोहोचविताना दिसून येत आहे. ही पोस्ट लक्षावधी लोकांनी लाईक केलेली आहे. हा व्यक्ती दिव्यांग असल्याने त्याला व्हिलचेअरवरच प्रवास करावा लागतो. तथापि, त्याने हार न मानता या व्हिलचेअरलाच आपल्या उत्पन्नाचे साधन बनविले आहे. व्हिलचेअरला मोटर बसविली असल्याने तो वेगाने प्रवास करू शकतो. झोमॅटोकडून फूड ऑर्डर्स घेऊन त्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तो करतो. त्याचे नाव अद्याप समजलेले नाही. तथापि, अनेकांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो पोस्ट केलेला आहे. त्याचे अनेकांनी कौतुकही केलेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article