Kolhapur Crime | कोल्हापुरात FDA ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! १३ लाख ६२ हजारांची अवैध इंजेक्शन्स जप्त
कोल्हापूर -कोणतीही परवानगी साठा नसताना इंजेक्शनचा केलेल्या एका औषध विक्री प्रतिनिधीकडे सुमारे १३ लाख ६२ हजार रुपयांची इंजेक्शन आढळून आली. ती अन्न आणि औषध प्रशासनाने सोमवारी जप्त केली. अन्न आणि औषध प्रशासनाची कोल्हापुरात आजपर्यतची सर्वात मोठी कारवाई आहे.या कारवाईबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त महेश कवटीकवार आणि औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनीमाहिती दिली. त्यांनी ही कारवाई सोमवारी केली.
सातारा येथील मेड टॅब्ज फार्मा याची ही इंजेक्शन आहेत. अन्न व औषध (औषध) विभागाच्या परवानगी शिवाय त्याचा साठा एका घरामध्ये ठेवला होता. विनापरवाना औषधांचा साठा आणि विक्री करता येत नाही, असे असताना अवैध इंजेक्शनचा साठा केला होता.
त्यानुसार एका औषध विक्री प्रतिनिधीकडे विनापरवाना अॅ न्टीबायोटिक्स इंजेक्शनचा साठा असल्याची माहीती मिळाली होती.सुभाष रोडवरील रविवार पेठ येथील एका घरामध्ये हा विनापरवाना इंजेक्शनचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाला मिळून आला. सहाय्यक आयुक्त महेश कवटीकवार व औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी तेथे छापा टाकून ही इंजेक्शन ताब्यात घेतली.