खांडेपार महामार्गावर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर
04:30 PM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
फोंडा : केरये-खांडेपार महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या कडेला बंद ट्रक उभा होता. याचदरम्यान मागून आलेल्या दुचाकीची ट्रकला जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर महामार्गावर वाहनांची सुरक्षितपणे पार्किंग करणे आणि वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. रस्त्याच्या कडेला सुरक्षेच्या उपाययोजनांशिवाय वाहने उभी राहू नयेत, तसेच अशा ठिकाणी वाहतूक विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.
Advertisement
Advertisement