कुडाळ, मालवण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत १० इमारतींना मंजुरी
आमदार निलेश राणेंचा पाठपुरावा ; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून १० कोटींचा निधी मंजूर
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कुडाळ तालुक्यात ५ व मालवण तालुक्यात ५ अश्या एकूण १० निवारा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. या निवारा केंद्रांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत बाधित नागरिकांना राहण्याची व्यवस्था होणार असून यात जनटेरेट रूम, सेप्टीक टॅंक, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह उपलब्ध होणार आहे. कुडाळ तालुक्यात बाव, पावशी, माणगाव, चेंदवन, नेरूर तर मालवण तालुक्यात देवली काळेथर, मसुरे देऊळवाडा, भोगलेवाडी, चिंदर, माडली या गावांमध्ये प्रत्येकी १ कोटी रुपये खर्च करून या निवारा केंद्राचे बांधकाम करण्यात येणार आहे. या निवारा केंद्रांच्या बांधकामासाठी एकत्रित १० कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांचे स्वीय सहाय्यक योगेश घाडी यांनी दिली आहे.