For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायालयाने घातलेले निर्देश पाळून दहीहंडी फोडावी

05:49 PM Aug 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
न्यायालयाने घातलेले निर्देश पाळून दहीहंडी फोडावी
Advertisement

राजू मसूरकरांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

सावंतवाडी

राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडणार आहे. यासाठी तरुणांना आकर्षित करून दहीहंडी फोडण्यासाठी काही मंडळांकडून तसेच विविध पक्षाच्या राजकीय पक्षाकडून लाखो रुपयाची बक्षीस आहेत. हिंदू धर्मातील कार्यक्रम अवश्य साजरा करावा. परंतु, उच्च न्यायालयाने घातलेल्या निर्देशाचे पालन करून दहीहंडी फोडण्यात यावी, बालकांना दिलेली वयोमर्यादा पाळावी असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी केले आहे. त्या प्रकारच्या सुचना स्थानिक पोलिस निरीक्षकांकडून संबंधितांना देण्यात यावा अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे त्यांनी केली आहे. ते म्हणाले....दहीहंडी फोडताना अपघात होऊन कोणाला अपंगत्व येऊ नये किंवा कोणी मृत्युमुखी पडू नये याची काळजी सर्व मंडळाकडून घेण्यात यावी. राजकीय पक्षांकडून आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयांची बक्षीस लावून दहीहंडी लावण्यात येते . मात्र , यातील जीवघेणे प्रकार थांबले पाहिजेत. तशी काळजी दहीहंडी मंडळांकडून घेतली पाहिजे. उच्च न्यायालयाने घातलेल्या शर्तींचे पालन करावे तसे न केल्यास गुन्हा दाखल होतो याची कल्पना देण्यात यावी. दहीहंडी हा सण अवश्य आनंदात साजरा करावा. परंतु , कोणत्याही व्यक्तीला दहीहंडी फोडण्यासाठी जास्त उंचीचा थर लावणे जीवावर बेतू नये यासाठी काळजी घेण्यात यावी. अशी मागणी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.