महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्ष सुनीता विल्यम्सच्या परतीकडे

06:39 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या सहकाऱ्यासोबत अंतराळातच अडकली असून या दोघांपुढच्या अडचणी संपता संपेना झाल्या आहेत. याचदरम्यान या मोहिमेला अंतिम स्वरुप देण्यासाठी शनिवारी एक महत्त्वाची बैठक नासा संस्थेने आयोजित केली असून त्यात कोणता निर्णय होतो हे पाहावे लागेल. सदरच्या दोघांनाही पुढील वर्षीच पृथ्वीवर आणले जाणार असल्याचे बोलले जात असले तरी दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता अधिकच गडद झाली आहे. भारतासह साऱ्या जगाचे लक्ष या दोघांच्या सुटकेकडे लागले आहे.

Advertisement

6 जूनला बोईंग स्टार लायनरमधून गेलेले सुनीता विल्यम्स व आणखी एक अंतराळवीर बूच विल्मोर हे दोघेही अंतराळात अडकले असून काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे परतणे आता अवघड होताना दिसते आहे. मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठीच्या आव्हानांचा सामना सध्याला दोघांनाही करावा लागतो आहे. हेलियमच्या गळतीमुळे त्याचप्रमाणे थ्रस्टर संबंधित आलेल्या अडचणींमुळे यानाला परत आणण्यासंदर्भातल्या अडचणी अधिकच गडद झाल्या आहेत. असे असले तरी दोघांकडून संशोधनाच्याबाबतीत सातत्याने प्रयत्न होत आहेत, ही सुखावह बाब आहे. अवकाशात फायबर ऑप्टिक केबल निर्मितीसंबंधातील संशोधनही त्यांच्याकडून सुरु असल्याची माहिती मिळते आहे. विल्यम्स आणि विल्मोर या दोघांचाही आपल्या कुटुंबियांशी संवाद होत असल्याचेही सांगितले जात आहे. ई मेल, फोन, व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबियांशी फावल्या वेळेत संपर्क साधत असल्याचे समजते. मोहिमेमध्ये एकटेपणा घालविण्यासाठी कुटुंबियांशी साधलेला संवाद महत्त्वाचा ठरतो आहे. यानासंदर्भातल्या दोषांचे निराकरण केले गेल्यास त्यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत सुखरुप आणता येणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

दोघाही सदस्यांना अंतराळामध्ये दिर्घकाळ राहण्याचा अनुभव आहे. यानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे राहणे वाढल्याने हाडांचे नुकसान होण्यासोबतच अनेक आरोग्याच्या समस्या नव्याने डोके वर काढू लागल्याचे समजते. तांत्रिक दोषांचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाद्वारे निराकरण केले जात असल्याचेही सांगितले जात आहे. या दरम्यान नासा संस्था या मोहिमेवर बारीक लक्ष ठेवत असून दोघांच्या आरोग्याचीही चौकशी करते आहे. त्यांना पृथ्वीवर सुरक्षित आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या पर्यायाचा विचारही संस्था करते आहे. उत्सर्जनच्या प्रक्रियेमुळे हाडांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगितले जाते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या बाबतीतही समस्या निर्माण झाल्याचे ऐकिवात आहे.याच दरम्यान या मोहिमेची जगभर चर्चा सुरु असताना भारतातील इस्त्राs या अवकाश संशोधन केंद्राचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  भारत या मोहिमेमध्ये काही मदत करू शकतो का? असा प्रश्न त्यांना केला असता, त्यांनी सध्याला अमेरिका आणि रशिया हे दोन देश या मोहिमेत निश्चितच मदत करू शकतात, असे म्हटले आहे. भारताला थेटपणे या मोहिमेसंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवणे हेच त्यांच्या सांगण्यातून स्पष्ट होते. या संदर्भात अमेरिका आणि रशिया हे दोन देश संशोधन करून दोघांनाही अडचणीतून वाचवतील अशी आशाही सोमनाथ यांनी वर्तवली आहे. अमेरिकेकडे क्रू ड्रॅगन यान आणि रशियाकडे सोयूज हे यान असून या दोन्हींचा वापर त्या दोघांच्या बचावासाठी केला जाऊ शकतो.  याबाबतीत आगामी काळात कोणती पावले उचलली जातात हे पाहावे लागेल. असेही त्यांनी म्हटले आहे. सध्या ही मोहिम काही गंभीर अवस्थेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बोईंग स्टार लायनर अंतराळात झेपावण्यापूर्वी सुरुवातीला अडथळे आले होते. त्यामुळेच मोहिमेची तारीख पुढे ढकलण्यात आली. तरीही नासा संस्थेने मोहिमेला अंतिम स्वरुप देत यान अंतराळात पाठविले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात खाद्य, पाणी, कपडे आणि ऑक्सीजन यांचा पुरेसा साठा असतो. नासा आणि स्थानक भागीदार आवश्यकतेनुसार वरील वस्तुंचा पुरवठा अंतराळवीरांना व्हावा यासाठी करत असतात. या मोहिमेकडे भारताचे विशेषतत्वाने लक्ष आहे कारण भारतीय वंशाची सुनिता विल्यम्स हिचा या मोहिमेत सहभाग आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत दोघांना आणले जाणार असल्याचे म्हटले जात असले तरी याबाबतीत त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी अशीच इच्छा व्यक्त केली जात आहे. सुनिता विल्यम्सच्या सुरक्षित परतण्याची आस तमाम भारतीयांना लागून राहिली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article