For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्जन्य सहलीचा केंद्रबिंदू राऊतवाडी धबधबा पावसाने प्रवाहित

08:06 PM Jun 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
पर्जन्य सहलीचा केंद्रबिंदू राऊतवाडी धबधबा पावसाने प्रवाहित
Rautwadi waterfall
Advertisement

राधानगरी / प्रतिनिधी

पावसाळा सुरू झाला की निसर्ग हा पर्यटकांना खुणावत असतो. राज्यातील असे बरेच ठिकाण आहेत ते पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करत असतात. मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा हा दोन दिवसापासून राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने पर्यटकांना आकर्षित करणारा राऊतवाडी धबधबा गुरुवार दुपार पासून प्रवाहित झाला आहे.

Advertisement

१५० फूट उंचीवरून कोसळणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहे. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा महाकाय धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, राऊतवाडी धबधबा हा राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होत असतात. राधानगरी तालुक्यातील पर्यटकांना खुणावणारा हा राऊतवाडी धबधबा कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर आहे. तर राधानगरीपासून साडेसहा किमी अंतरावर असून हत्तीमहाल- पडळी मार्गे ह्या धबधब्याकडे जाता येते.

Advertisement
Advertisement
Tags :

.