एफएमसीजी क्षेत्राचा महसुल6 ते 8 टक्के वाढणार : क्रिसील
कोलकाता :
आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील एफएमसीजी क्षेत्राचा महसुलातील वाटा 6 ते 8 टक्के इतका वाढीव राहणार आहे, असा अंदाज क्रिसील या रेटींग संस्थेने व्यक्त केला आहे.
सध्याच्या आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एमएमसीजी क्षेत्र साधारणपणे महसुलामध्ये 5 ते 6 टक्के इतकी वाढ दर्शवू शकते. एमएमसीजी क्षेत्रातील विविध वस्तुंच्या विक्रीचा विचार केल्यास विक्री 4 ते 6 टक्के वाढलेली दिसून येऊ शकते, असे रेटिंग संस्थेने म्हटले आहे. ही परिस्थिती पाहता आर्थिक वर्ष 2026 मध्ये आणखी दोन टक्क्यांची महसुलामध्ये वाढ अपेक्षित आहे. एमएमसीजी क्षेत्रामध्ये वेगाने विकल्या जाणाऱ्या वस्तुंचा समावेश असतो. ज्यामध्ये साबण, बिस्कीट, कॉफी, डोक्याला लावायचे तेल, चहापावडर यासह विविध वस्तुंचा समावेश असतो. वरील गोष्टींच्या किंमती अलीकडच्या काळामध्ये वाढल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही क्रिसीलने मत नोंदविले आहे.