For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लायओव्हरच्या कामाला ऑक्टोबरमध्ये प्रारंभ

06:30 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्लायओव्हरच्या कामाला ऑक्टोबरमध्ये प्रारंभ
Advertisement

निविदा प्रक्रिया पूर्ण : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित फ्लायओव्हरच्या कामाला ऑक्टोबर महिन्यात सुऊवात करण्यात येणार आहे. या योजनेसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्यादृष्टीने आवश्यक तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

Advertisement

शहरातील वाढती वाहतूक व महत्त्वाच्या मार्गांवरील कोंडी लक्षात घेता फ्लायओव्हर योजना महत्त्वाची मानली जात आहे. योजनेचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार आहे. कामाची अंमलबजावणी नियोजनबद्ध व निर्धारित कालावधीत करण्यावर भर दिला जाणार असून त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत.

फ्लायओव्हरच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. फ्लायओव्हरच्या मार्गावरील सर्व झाडांचे संरक्षण करण्याचे नियोजन केले आहे. ज्या ठिकाणी प्रकल्पाच्या कामामुळे झाडे हलविणे आवश्यक ठरेल, तेथे वनविभागाच्या सहकार्याने त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने स्थलांतर करण्यात येणार आहे.

विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याला प्राधान्य देण्यात येणार असून झाडांचे जतन व योजनेची अंमलबजावणी यांचा समन्वय साधला जाणार आहे. झाडांचे स्थलांतर करताना त्यांची सुरक्षितता व पुनर्लागवडीची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात येणार आहेत. फ्लायओव्हरमुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच वाहनचालकांचा वेळ व इंधनाची बचत होण्याची अपेक्षा आहे.

विकासकामांसोबत पर्यावरण संरक्षणालाही समान महत्त्व

निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळणार असून ऑक्टोबरपासून काम सुरू करण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही केली जात आहे. योजनेच्या कामादरम्यान नागरिकांना कमीतकमी त्रास होईल, यासाठी वाहतूक व्यवस्थापनाचेही नियोजन करण्यात येणार आहे. विकासकामांसोबत पर्यावरण संरक्षणालाही समान महत्त्व देऊन फ्लायओव्हरचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.