Kolhapur News : कोल्हापुरात भरारी पथकांचा असणार वॉच
कोल्हापूर निवडणुकीत पारदर्शकतेसाठी भरारी पथक तैनात
कोल्हापूर : दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व पारदर्शकतेसाठी प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या आदेशानुसार भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. भरारी पथक, स्थिर पथक आणि व्हिडीओ पडताळणी पथक अशी पथके तैनात केली आहेत. या पथकांचा शहरावर बाँच राहणार आहे.
भरारी पथकामध्ये ५४, व्हिडीओ पडताळणीमध्ये ३५ आणि स्थिर पथकामध्ये ९९ कर्मचारी असणार आहेत. तर झोनल ऑफिसर म्हणून ६१ कर्मचारी तसेचलेखापरीक्षणासाठी ४९ कर्मचारी अशा एकूण ३३३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती भरारी पथकामध्ये करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख ११ नाक्यांवर तीन शिफ्टमध्ये पथकांची तैनाती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत नियमभंग रोखण्यासाठी आणि प्रक्रियेवर सतत देखरेख ठेवण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहणार आहे.