फ्लुमेनेसी क्लब उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था / फ्लोरीडा
फिफाच्या विश्व चषक क्लब स्तरीय फुटबॉल स्पर्धेत फ्लुमेनेसी क्लबने उपांत्यफेरीत प्रवेश केला. फ्लुमेनेसीने येथे झालेल्या सामन्यात अल हिलालचा 2-1 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला.
हा सामना सुरू होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू दिवंगत दियागो जोटाला दोन्ही संघातील खेळाडूंनी काहीवेळ मौन पाळून श्ा़dरद्धांजली वाहिली. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना मथायस मार्टेनेलीने अल हलालच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत फ्लुमेनेसीचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तराधाला प्रारंभ झाल्यानंतर सहाव्याच मिनिटाला लिओनार्दोने अल हलालला बरोबरी साधून दिली. हा सामना निर्धारीत वेळेत बरोबरी राहिल, असे वाटत असतानाच बदली खेळाडू हक्युलसने फ्लुमेनेसीचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवून अल हलालचे आव्हान संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत फ्लुमेनेसी आणि चेल्सी यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.