एसटीच्या दीड कोटी उत्पन्नावर ‘पुराचे पाणी’! कोल्हापूर एसटी विभागाला अतिवृष्टीचा व पुराचा फटका :
पंधरा दिवसात 1 हजार 187 लालपरीची थांबली चाके : 11 हजार 894 फेऱ्या झाल्या रद्द : 51 हजार किलोमीटरची धाव थांबली : अतिवृष्टीमुळे प्रवासी संख्याही घटली : अजुनही अनेक मार्ग पाण्याखाली
इम्रान गवंडी कोल्हापूर
मागील पंधरा दिवसात जिह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे महापुराचा विळखा घट्ट झाला होता. अनेक मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे 15 ते 30 जुलै दरम्यान एसटीच्या कोल्हापूर विभागाला तब्बल 1 कोटी 56 लाख 60 हजार 288 रूपयांच्या उत्पन्न बुडाले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने जिह्यातील 12 आगारांतील 11 हजार 894 फेऱ्या रद्द झाल्या.
कोल्हापूर जिह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद राहिल्याने एसटीची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे जिह्याच्या 12 आगारांतून विविध मार्गावर धावणाऱ्या 1 हजार 187 ‘लालपरी’ ची चाके जागीच थांबून राहीली. अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक फटका कोल्हापूर आगाराला बसला आहे. कोल्हापूर आगाराचे पंधरा दिवसात 24 लाख 34 हजार 890 रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. पावसामुळे झालेले नुकसान आगामी काळात भरून काढण्यासाठी विविध उपक्रम राबवून प्रयत्न केले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्याला मागील पंधरा दिवसांत पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यातील राधानगरी धरणासह सर्वच धरणे 100 टक्के भरल्याने विसर्ग सुरू झाला. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने महापुराचा विळखा घट्ट झाला होता. जिल्ह्यातील सुमारे 90 बंधारे पाण्याखाली होते. अनेक मार्गही बंद असल्याने गावातील संपर्क तुटला होता. त्यामुळे वाहतुकही थांबली होती. त्यामुळे परिवहन विभागालाही एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. अजुनही पुराचे पाणी संथ गतीने उतरत असुन जिल्हातील प्रमुख मार्गावरील वाहतुक बंदच आहे.
अतिवृष्टीमुळे प्रवासी सख्या घटली
जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांनी परगावीचा प्रवास टाळला आहे. त्यामूळे अनेक आगारामध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे. अद्यापही पाऊस सुरू असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. याच्या उत्पन्नाचा फटकाही परिवहन मंडळाला बसत आहे.
कोल्हापूर आगाराला सर्वाधिक फटका
कोल्हापुर विभागातील 12 आगारापैकी कोल्हापूर आगाराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पंधरा दिवसांत कोल्हापूर आगारांतील 142 एसटी जागीच थांबून राहिल्या. यामध्ये 1 हजार 299 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. अतिवृष्टीमुळे 70 हजार 454 किलोमीटरची धाव रद्द झाली. एकूण 24 लाख 34 हजार रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले आहे.
नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न
अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मागील पंधरा दिवसांत 11 हजार 894 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या असुन दीड कोटी रूपयांच्यावर एसटीचे नुकसान झाले आहे. पुर काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आगामी काळात विविध उपक्रम राबवून प्रयत्न केले जातील.
अनघा बारटक्के, एसटी विभागीय वाहतूक निरिक्षक, कोल्हापूर
15 ते 30 जुलैपर्यंत पावसामुळे झालेले नुकसान असे
आगार थांबलेल्या एसटी रद्द फेऱ्या एकूण नुकसान
कोल्हापूर : 142 1,299 24,34,890
संभाजीनगर : 203 1,710 21,52,032
गडहिंग्लज : 213 3,002 20,52,695
इचलकरंजी : 40 668 6,32,642
गारगोटी : 149 1,212 21,72, 899
मलकापूर : 78 600 9,50,397
चंदगड : 52 659 14,32, 417
कुरूंदवाड : 77 1003 7,23, 481
कागल : 18 202 3,59,886
राधानगरी : 123 1049 15, 38,179
गगनबावडा : 60 212 7,31,960
आजरा : 32 278 3,85,855
----------------------------,!0
एकूण : 1187 11,894 1,56,60,288