महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सरूड परिसराला महापूराचा वेढा : वारणा व कडवी नदीच्या महापुरामुळे परिसराला बेटाचे स्वरूप

05:50 PM Jul 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
Warna and Kadavi river surrounds Sarud
Advertisement

परिसर गेली दोन दिवसापसुन महापुराच्या विळख्यात

सरुड : वार्ताहर

वारणा व कडवी नदीच्या महापूराने सरुड परिसराला चोहोबाजुनी वेढा घातला असुन या महापूरामुळे सरुड परिसराला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे . त्यामुळे सरुड परिसर हा गेल्या दोन दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडला आहे . शुक्रवारी सकाळी सरुडहून बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गावर या महापूराचे पाणी आले आहे . परिणामी सरुडसह या परिसरातील वारणा व कडवी नदी काठच्या गावांचा इतर गावाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे . महापूरामुळे सरुड परिसरातील जनजीवन विस्कळित झाले आहे .

Advertisement

परिसरातील पूरस्थिती गंभीर बनल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . दरम्यान अतिवृष्टीमुळे आजअखेर सरुडमध्ये १३ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे . महापूरामुळे गेली दोन दिवस परिसरातील हजारो लिटर दुधाचे संकलन ठप्प झाले असून यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे .

Advertisement

सरुड - सागाव मार्गावर वारणा नदीच्या तर सरुड - बांबवडे मार्गावर कडवी नदी पुलानजीक भराव रस्त्यावर कडवी नदीच्या पुराचे पाणी आले आहे . सरुड - मलकापूर मार्गावरही शिंपे , सौते , शिरगाव ,कोपार्डे आदी गावादरम्यान ठिकठिकाणी कडवी नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे . सरुड - वारणा कापशी या मार्गावर कापशी दरम्यान वारणा नदीच्या पुराचे पाणी आले आहे . त्यामुळे सरुडहून बाहेर जाणारे सर्वच मार्ग शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद राहीले . वारणा नदीवरील शित्तूर वारूण - आरळा, सोंडोली - चरण , भेडसगाव - बिळाशी , सरुड - सागाव या दरम्यान असणारे चार पुल व रेठरे - कोकरूड, माणगाव - शिराळे खुर्द हे दोन बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत . तर कडवी नदीवरील , शिरगाव - सांबू या पुलासह , शिरगाव - सावर्डे खुर्द , सरुड - पाटणे हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत . चांदोली व कडवी धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने या दोन्ही धरणातुन मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वारणा व कडवी नदीत केला जात आहे . त्यामुळे या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले असून याचा सर्वात मोठा फटका सरुड परिसराला बसला आहे . दोन्ही नद्यांच्या पूर पातळीत वाढ होत असल्याने सरुडसह परिसरातील शिंपे , सौते , वडगाव आदी गावामधील पूरबाधित रेषेतील कुटुंबियांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे . गेल्या दोन दिवसांपासून सरुडसह परिसरातील गावे महापूराच्या विळख्यात सापडली आहेत . तसेच वारणा व कडवी नदीकाठची पिके गेल्या आठ दिवसांपासून पुराच्या पाण्याखाली गेल्याने नदीकाठाशेजारील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत .

Advertisement
Tags :
f Warna and Kadavi riverflood of WarnaSarud islandtarun bharat newsWarna and Kadavi river
Next Article