कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगन्नाथ रथयात्रेत भाविकांचा ‘महापूर’

06:22 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘जय जगन्नाथ’चा गजर : जागतिक शांतीची कामना

Advertisement

► वृत्तसंस्था/ पुरी

Advertisement

ओडिशातील पुरीमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा शुक्रवारी सुरू झाली. या उत्सवादरम्यान ‘महापुरा’प्रमाणे सहभागी झालेल्या हजारो भाविकांनी भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भावंडांचे रथ मंदिरापासून श्री गुंडीचा मंदिरापर्यंत ओढण्यास सुरुवात केली. शुक्रवारी संध्याकाळी रथयात्रा मध्यंतरी थांबवण्यात आली. आता शनिवारी पुन्हा एकदा गुंडीचा मंदिरासाठी रथयात्रा सुरू होईल.

 

जगन्नाथपुरीतील वार्षिक उत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून लाखो लोक तीर्थक्षेत्रस्थळी पोहोचले आहेत. येथे सर्वत्र वातावरणात ‘हरी बोल’ आणि ‘जय जगन्नाथ’चा गजर गुंजत होता. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रथम भगवान बलभद्र, नंतर देवी सुभद्रा आणि शेवटी भगवान जगन्नाथ त्यांच्या रथांवर स्वार झाले. मंदिराच्या सिंहद्वारपासून सुरू झालेल्या रथयात्रेत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने भगवानांचे रथ श्री गुंडीचा मंदिरापर्यंत ओढले. त्यापूर्वी दुपारी 3 वाजता पुरीचे गजपती महाराज दिव्य सिंह देव यांनी सोन्याच्या झाडूने छेरा घालून रथयात्रेला औपचारिक सुरुवात केली. ही यात्रा श्रीमंदिरापासून 3 किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरात जाते.

भगवान बलभद्रांचा रथ बडगंडी येथे, देवी सुभद्राचा रथ मर्चिकोट येथे आणि भगवान जगन्नाथाचा रथ सिंहद्वार येथे थांबला आहे. रथोत्सवावेळी नंदीघोष रथाजवळ चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने 10 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी दोन रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या. बडदंड येथे गर्दीत एक रुग्णवाहिका अडकल्याचे दिसून आले.

पंतप्रधान-राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

12 दिवस चालणाऱ्या रथयात्रेबद्दल भाविकांचा उदंड सहभाग दिसून येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ रथयात्रेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी इन्स्टाग्रामवर ‘भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेच्या शुभ मुहूर्तावर सर्व देशवासियांना माझ्या शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तीचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि चांगले आरोग्य घेऊन येवो अशी माझी इच्छा आहे. जय जगन्नाथ!’ असा संदेश जारी केला आहे.

यात्रेच्या पहिल्या दिवशी येथे 10 ते 12 लाख लोक उपस्थित असल्याचा अंदाज आहे. येथे प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापन व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण शहराला सुरक्षा कवच क्षेत्रात रुपांतरित करण्यात आले आहे. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि 200 हून अधिक ओडिशा पोलीस प्लाटून तैनात करण्यात आले आहेत. तसेच आरएएफच्या तीन कंपन्यांसह सीएपीएफच्या 8 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एनएसजी, एनएसजी स्नायपर्स, सीओएसजी, कोस्ट गार्ड ड्रोन आणि ड्रोनविरोधी प्रणालींसह अनेक तांत्रिक पथके ओडिशा पोलिसांना सहकार्य करत आहेत. याशिवाय, कॅनाइन टीम आणि ओडिशाचे अँटी-सॅबोटेज युनिट सारखी विशेष यंत्रणा दिमतीसाठी सज्ज आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article