उत्तर प्रदेशात पूरसदृश परिस्थिती
पाटणामध्ये 21 सप्टेंबरपर्यंत शाळा बंद, मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे 21 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यमुना, घाघरा, शारदा, सरयू नद्यांनी धोक्मयाचा टप्पा ओलांडला आहे. चित्रकूटमधील मंदाकिनी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रामघाट पाण्याखाली गेला आहे. वाराणसीतील गंगा धोक्मयाच्या चिन्हापासून अवघ्या 44 सेंमी दूर आहे. प्रयागराज, मिर्झापूर आणि इटावामध्ये आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, नेपाळमधील मुसळधार पावसामुळे बिहारमधील नद्यांनाही पूर आला आहे. पाटण्यात गंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे दियारा भागातील शाळा 21 सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम, बांकुरा, हावडा, हुगळी, उत्तर-दक्षिण 24 परगणा, पूर्व-पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम वर्धमान जिह्यांमध्येही पूरस्थिती आहे. राज्यात 24 तासात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेश-राजस्थानसह 13 राज्यांमध्ये अलर्ट
मध्यप्रदेशातील 24 हून अधिक जिह्यांमध्ये मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पाऊस झाला. राज्यात पावसाळ्यात आतापर्यंत 41 इंच पाऊस झाला असून तो सामान्य पावसापेक्षा 10 टक्के जास्त आहे. राजस्थानमधील 22 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मध्यप्रदेश आणि हरियाणासह 13 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली.
पश्चिम बंगालमधील 9 जिह्यांमध्ये पुरामुळे अनेक धरणे भरल्यामुळे बॅरेजेसमधून पाणी सोडण्यात आले आहे. दुर्गापूर बॅरेजमधून 1 लाख 33 हजार क्मयुसेक, कांगसाबती धरणातून 40 हजार क्मयुसेक, मायथन धरणातून 2 लाख क्मयुसेक आणि पानशेत धरणातून 50 हजार क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणाच्या आसपासच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.