बांदा परिसरात पूरसदृश स्थिती
इन्सुली, वाफोली, शेर्ले गावातील काही भागात पुराचे पाणी
मयुर चराटकर
बांदा
आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बांदा नजीकच्या अनेक गावांत पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने बांदा, इन्सुली, वाफोली, शेर्ले परिसरात काही घरात पुराचे पाणी शिरले आहे. अनेक गावांचा वाड्याचा पाणी वाढल्याने शहराशी संपर्क तुटला आहे. सध्या स्थितीत काही भागात पुराचे पाणी वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांदा सावंतवाडी मार्गावर पाणी आल्याने सावंतवाडीच्या दिशेने होणारी वाहतूक बंद झाली आहे. तिलारी कालवा ओव्हरफ्लो झाल्याने इन्सुली कोठावळेबांध येथे काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली होती. ऐन भातशेती हंगामात पूर स्थिती निर्माण झाल्याने अनेकांची शेतीची अवजारे वाहून गेली तर भाताची रोपे सुद्धा वाहून गेलीत. काहीची गुरे शेतमांगरात अडकून राहिली असून त्यासाठी स्थानिक प्रशासन मदत कार्य करीत आहे. पुराच्या शक्यतेने महसूलसह पोलीस व ग्रामपंचायतची यंत्रणा अलर्ट झाली आहे.