For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अर्णव चक्रीवादळानंतर ओडिशात पुराचे संकट

07:00 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्णव चक्रीवादळानंतर ओडिशात पुराचे संकट
Advertisement

नद्यांना पूर : अनेक गावांचा संपर्क तुटला : नागरिकांना एअरलिफ्ट करण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/भुवनेश्वर

‘अर्णव’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू लागला असला, तरी त्यानंतर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओडिशाच्या दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. गंजाम आणि गजपती जिह्यांतील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून, दोन हजारांहून अधिक नागरिक विविध ठिकाणी अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने बचावकार्य तीव्र केले आहे. काही नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्याची तयारीही सुरू आहे.

Advertisement

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण ओडिशामध्ये सलग मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नद्या आणि नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गंजाम जिह्यातील ऋषिकुल्या नदीने पुराची धोक्मयाची पातळी ओलांडली आहे. पुरूषोत्तमपूर येथे नदीची धोक्मयाची पातळी 16.835 मीटर असताना पाणीपातळी 17.500 मीटरपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. सोरडा परिसरातील पालकाटू, नुआगाव, ताताबाली आणि सुरमणी या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. काही भागांत गुडघाभर पाणी साचले असून, नागरिकांना दैनंदिन गरजांसाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ओडिशा प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय साधला जात आहे. धराकोट परिसरातील चार ठिकाणी अडकलेल्या सुमारे 120 नागरिकांना हवाई मार्गाने बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मुसळधार पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे ओडिशा आपत्ती त्वरित कृती दलाच्या (एसडीआरएफ) पथकांकडून बोटींच्या साहाय्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

313 बचाव पथके तैनात

चक्रीवादळ आणि पुराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत. राज्यातील विविध जिह्यांमध्ये ओड्राफ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि अग्निशमन दलांची पथके तैनात करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेऊन वीजपुरवठा, पिण्याचे पाणी आणि दूरसंचार सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. बचावकार्याला गती देण्यासोबतच प्रभावित नागरिकांना अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवण्यावर भर दिला जात आहे.

हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओडिशातील आठ जिह्यांमध्ये 634 निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, 43 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. या केंद्रांमध्ये भोजन, पिण्याचे पाणी, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रभावित भागांतील रस्त्यांवर पडलेली झाडे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे ओडिशातील खरीप हंगामातील भातपिकाला फटका बसण्याची शक्मयता आहे. कापणीसाठी तयार असलेल्या पिकांमध्ये पाणी साचल्यास उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक मदत देण्याची तयारी केली जात आहे. दरम्यान, चक्रीवादळ कमकुवत होत असले तरी दक्षिण ओडिशातील काही भागांत पूर आणि अतिवृष्टीचा धोका कायम आहे.

आंध्रातही नुकसान

‘अर्णव’ चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही मोठा परिणाम झाला आहे. 28 ऑक्टोबर रोजी चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले, तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किलोमीटरपर्यंत पोहोचला होता. वाऱ्याच्या जोरदार झोतांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत नोंदवण्यात आला. या वादळामुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले, घरे व रस्त्यांचे नुकसान झाले आणि अनेक भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला. आंध्र प्रदेशात सहा मृत्यूंची अधिकृत नोंद होती;  वादळापूर्वी आंध्र प्रदेश आणि ओडिशा मिळून 1.8 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.