For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चित्ररथ मिरवणुकीत सजीव देखाव्यांवर अधिक भर देणार

12:57 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
चित्ररथ मिरवणुकीत सजीव देखाव्यांवर अधिक भर देणार
Advertisement

शहापूर शिवजयंती महामंडळाच्या बैठकीत निर्णय

Advertisement

बेळगाव : बेळगावच्या पारंपरिक शिवजयंतीला 107 वर्षांचा इतिहास असून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांतून हजारो शिवभक्त या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. 19 एप्रिल रोजी पारंपरिक शिवजयंती साजरी केली जाणार असून मंगळवार दि. 21 रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. मंडळांनी शिवचरित्रावर आधारित सजीव देखाव्यांवर भर देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचवावा, असा निर्णय शहापूर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मंगळवारी साईगणेश सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव होते. 19 रोजी सकाळी 10 वा. शहापूर शिवजयंती महामंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे पूजन केले जाणार आहे. 21 रोजी बॅरिस्टर नाथ पै चौक येथे सायंकाळी पहिल्या चित्ररथाचे मानकऱ्यांच्या हस्ते पूजन केले जाणार आहे. तसेच शहापूर, अनगोळ आणि वडगाव भागातून येणाऱ्या चित्ररथांचे स्वागत महामंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सव मंडळांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी महामंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

मध्यवर्ती म. ए. समितीचे नूतन अध्यक्ष प्रकाश मरगाळे तसेच मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे नूतन अध्यक्ष अंकुश केसरकर यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत भातकांडे, श्रीकांत कदम, महादेव पाटील, पी. जी. घाडी, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, रणजित हावळाण्णाचे आदींनी विचार व्यक्त केले. या बैठकीला अशोक चिंडक, हिरालाल चव्हाण, श्रीकांत प्रभू, श्रीधर जाधव, सचिन केळवेकर, अभिजीत मजकूर, सूरज चव्हाण, मंगेश नागोजीचे, राजाराम सूर्यवंशी, अनिल अमरोळे, बाबू कोले, शशिकांत सडेकर, एस. आर. चौगुले, शिवकुमार मनवाडकर, जोतिबा मासेकर यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.