For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लिपकार्टचे सीएफओ वेंकटरामन पायउतार

06:42 AM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्लिपकार्टचे सीएफओ वेंकटरामन पायउतार
Advertisement

सध्याला तात्पुरती सांभाळणार जबाबदारी : आयपीओ आणण्याची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य वित्त अधिकारी अर्थात सीएफओ श्रीराम वेंकटरामन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी शेअर बाजाराला त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. वेंकटरामन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असला तरी आणखी काही काळासाठी ते हे पद सांभाळणार आहेत. सध्याच्या कंपनीच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये व जबाबदाऱ्यांचे हस्तांतरण करण्यासाठी ते या पदावर सध्या तरी असतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.  रवी अय्यर हे सीएफओपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.  फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्ट यांची गुंतवणूक आहे. याच दरम्यान वरिष्ठ पातळीवरसुद्धा बदल करण्यात आले असून निशांत वर्मन यांची वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisement

आयपीओ आणणार

2007 मध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्लिपकार्ट समूहामध्ये फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लियरट्रिप आणि सुपर डॉट मनी सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. येत्या काळामध्ये फ्लिपकार्ट आपला आयपीओ सादर करणार आहे. 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीच्या काळामध्ये कंपनी आपला आयपीओ सादर करू शकते अशीही माहिती मिळते आहे. याच दरम्यान समूहाचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी आयपीओसंदर्भात काही गुंतवणूक बँकांशी प्राथमिक चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे. फ्लिपकार्टची टक्कर ही अॅमेझॉन व मीशो यांच्याशी असणार आहे. मीशोचे समभाग डिसेंबर 2025 मध्ये बाजारात सुचीबद्ध झाले आहेत.

कर्मचारी कपात

अलीकडेच फ्लिपकार्टने 300 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन नारळ दिला होता. वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन कंपनीने ही कर्मचारी कपातीची योजना राबवली होती. खालच्या श्रेणीतील, मध्यम व्यवस्थापन व टेक संघातील कर्मचाऱ्यांवरही नोकरी गमावण्याची वेळ आली होती.

Advertisement
Tags :

.